Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे विश्व अहिंसा दिनानिमित्त ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे’ आयोजन 

najarkaid live by najarkaid live
October 1, 2023
in जळगाव
0
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे विश्व अहिंसा दिनानिमित्त  ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे’ आयोजन 
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि.३० (प्रतिनिधी) – महात्मा गांधी यांचा जन्म दिवस ‘विश्व अहिंसा दिन’ जगभर साजसा केला जातो. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षा प्रमाणे यंदा ही ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे’ आयोजन करण्यात आले आहे.

महात्मा गांधीजींच्या १५५ व्या व लाल बहादूर शास्त्रीजींच्या १२० वी जयंती निमित्ताने आयोजीत ‘अहिंसा सद् भावना शांती यात्रा’ २ ऑक्टोबरला सकाळी ७ वाजता लाल बहादूर शास्त्री टॉवरपासून निघून पंडीत जवाहरलाल  नेहरू चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-डॉ. हेडगेवार चौक, नवीन बसस्टॅण्ड मार्गे महात्मा गांधी उद्यानात यात्रा येईल.

या सद्भावना शांती यात्रेत पाणी पुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील,  ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एन. माहेश्वरी, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, जळगाव महानगर पालिकेच्या प्रशासक सौ. विद्या गायकवाड, के.सी. ई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे आणि केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर आदी मान्यवर निमंत्रीत आहेत. सोबत शहरातील नागरिक व विद्यार्थी हजारोच्या संख्येने यात सहभागी होणार आहेत.

रॅलीनंतर महात्मा गांधी उद्यानात होणाऱ्या विश्व अहिंसा दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमामध्ये  मा. श्रीमती अनुराधा शंकर अतिरिक्त पोलिस महासंचालक (ADGP) मध्यप्रदेश ह्या प्रमुख अतिथी असून, अध्यक्ष म्हणून मा. श्री. आयुष प्रसाद जिल्हाधिकारी जळगाव हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी उपस्थितीतांना गांधीजींचे पणतु मा. श्री. तुषार गांधी हे अहिंसेची शपथ देणार आहेत. शहरातील प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक व शालेय विद्यार्थी सहभागी होणार असून आपण सर्वांनी मोठ्या संख्येने ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेत’ सहभागी होऊन राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या विचारांना अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आणि शाश्वत जीवनाच्या दिशेने पुढे जाऊ या, असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक व जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी केले आहे.

चरखा जयंती निमित्त अखंड सूत कताई

महात्मा गांधींनी चरखा किंवा चरखा हे राजकीय मुक्तीसाठी एक महत्त्वाचे साधन म्हणून वापरून, ‘प्राचीन कार्य नीतिमत्तेचे’ रूपक म्हणून आणि ब्रिटिश राजवटीला आर्थिक आणि सामाजिक प्रतिक्रियेचे प्रतीक म्हणून वापरले. २ ऑक्टोबर ह्या दिवशी चरखा जयंती ही साजरी केली जाते त्या निमित्ताने गांधी तीर्थ येथे अखंड सूत कताई होणार आहे. महात्मा गांधी जयंतीच्या औचित्याने गांधीतीर्थ सुरू राहणार आहे.

खानदेश में महात्मा गांधी पुस्तकाचे प्रकाशन

महात्मा गांधीजींचे व्यक्तिमत्व आज त्रिखंडात सर्वमान्य झाले आहे. या देशातल्या पहिल्या ग्रामीण कॉंग्रेस अधिवेशनाचा मान खानदेशातील फैजपूर नगरीला लाभला. गांधीजी म्हणत की, महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे. खानदेशात गांधीजी आलेत व खानदेश गौरवान्वित झाला. लोकमान्य टिळक फंडाच्या निमित्ताने गांधीजी खानदेशात आले तेव्हा त्यांचे कमालीच्या उत्साहात  सर्वत्र स्वागत झाले. मानपत्रे व भेटवस्तु देण्यात आल्यात. त्यांचा लिलाव करून ती रक्कम फंडात जमा झाली. वेगवेगळ्या संस्थांना, सामाजिक उपक्रमांना, व्यावसायिकाना भेटून गांधीजींनी देशाच्या स्वातंत्र्याची मशाल तेवती राखली. यात आबालवृध्द स्त्री-पुरुषांचा उत्कट सहभाग होता. अशा अनेक घटनांची नोंद असलेल्या ऐतिहासिक पुस्तकाचे प्रकाशनही या वेळी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक वितरण

गांधी रिसर्च फाउंडेशनच्यावतीने सोमवार, दि. २ ऑक्टोबर २०२३ रोजी विश्व अहिंसा दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी कांताई सभागृहात गांधीतीर्थद्वारे देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे. इ. ५ वी ते १० वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना या स्पर्धेतील विजेत्यांना कार्यक्रमानंतर लगेचच पारितोषिके देखील मान्यवरांच्याहस्ते प्रदान होणार आहेत. या कार्यक्रमास अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

छातीत चाकूने वार करून तरुणाला संपविले ; भुसावळ शहर खुनाच्या घटनेने हादरले

Next Post

नाशिक येथे ‘या’ दिवशी होणार श्रीलंकेतील अनुराधापूर येथील बोधी वृक्षाच्या फांदीचे रोपण

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
नाशिक येथे ‘या’ दिवशी होणार श्रीलंकेतील अनुराधापूर येथील बोधी वृक्षाच्या फांदीचे रोपण

नाशिक येथे 'या' दिवशी होणार श्रीलंकेतील अनुराधापूर येथील बोधी वृक्षाच्या फांदीचे रोपण

ताज्या बातम्या

Instagram Crime : लग्नाचे आमिष दाखवून विवाहित महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडिओने ब्लॅकमेल

Instagram Crime : लग्नाचे आमिष दाखवून विवाहित महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडिओने ब्लॅकमेल

March 13, 2026
Share Market Tips : आजच्या बाजारात गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? तज्ज्ञांचे 7 महत्त्वाचे सल्ले

Share Market Tips : आजच्या बाजारात गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? तज्ज्ञांचे 7 महत्त्वाचे सल्ले

March 13, 2026
Gas Booking : युद्धाचे परिणाम...फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

Gas Booking : युद्धाचे परिणाम…फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

March 13, 2026
Breast Cancer

धक्कादायक रिपोर्ट! जंक फूडमुळे भारतात Breast Cancer ४७८% वाढला; प्रत्येक कुटुंबाने जाणून घ्या हा धोका

March 13, 2026
शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

March 13, 2026
Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us