Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय एकपात्री अभिनय स्पर्धा ; विजेत्यांसाठी भरघोस रोख पारितोषिके; 2 ऑक्टोबरला पारितोषिक वितरण होणार

najarkaid live by najarkaid live
September 10, 2021
in जळगाव
0
गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय एकपात्री अभिनय स्पर्धा ; विजेत्यांसाठी भरघोस रोख पारितोषिके; 2 ऑक्टोबरला पारितोषिक वितरण होणार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि.१० (प्रतिनिधी) – महात्मा गांधीजींच्या 153 व्या जयंतीनिमित्त गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय पातळीवरील एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजण्यात आलेली आहे. महात्मा गांधीजींनी जवळजवळ सर्वच विषयांवर चिंतन केले, आपला प्रभाव टाकला आहे. त्यातील अभिनय हा तर त्यांच्या बालपणापासूनच आवडीचा विषय होता. विद्यार्थ्यांमध्ये अभिनय कला रुजविणे व महात्मा गांधीजींच्या विचारांच्या जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यासाठी 15 सप्टेंबर पर्यंत निःशुल्क नोंदणी व 20 सप्टेंबर पर्यंत आपले व्हिडीओ पाठविणे आवश्यक आहे. विजेते व पारितोषिक वितरण 2 ऑक्टोबरला ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, असे स्पर्धेचे आयोजक गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे कळविले आहे.

दोन गटासाठी भरघोस रोख पारितोषिके

5 ते 10 वी इयत्तेतील आणि 11 वी ते खुला गट अशा दोन गटातील स्पर्धेसाठी आयोजकांनी भरघोस अशी रोख पारितोषिके ठेवलेली आहेत. पहिल्या 5 ते 10 गटासाठी प्रथम – (15,000), द्वितीय – (11,000), तृतीय – (7,000), आणि दोन उत्तेजनार्थ (प्रत्येकी 5, 000) रुपये असे पारितोषिके आहेत. दुसऱ्या गटासाठी विजयी पहिल्या तीन स्पर्धकांना अनुक्रमे 21,000 (प्रथम), 15,000 (द्वितीय), 10,000 (तृतीय) आणि प्रत्येकी 5 हजार रुपयांचे दोन उत्तेजनार्थ रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. शिवाय प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र देखी देणार आहे.

.

एकपात्री नाट्य प्रयोगाच्या व्हिडीओ बाबत

प्रस्तुत दोन गटाकरीता घेतल्या जाणाऱ्या एकपत्री अभिनय स्पर्धेसाठी गांधीजींचे जीवन, व्यक्तीमत्व, विचार, तत्त्व, कार्य, प्रेरक प्रसंग तसेच गांधीजींच्या विचारांना केंद्रस्थानी ठेऊन एकपात्री नाट्य बनवू शकतात. वरील विषयावर इंग्रजी, हिंदी किंवा मराठी पैकी कोणत्याही एका भाषेत स्वतंत्र स्क्रिप्ट लेखन असावे. आक्षेपार्ह, राजकीय, जातीयता, सामाजिक तेढ निर्माण करणारी स्क्रिप्ट नसावी. लिखीत स्क्रिप्टनुसार एकपात्री नाट्याचे व्हीडीओ (चित्रण एमपी फोर) फॉरमॅटमध्ये करणे आवश्यक आहे. हे चित्रण कॅमेरा वा मोबाईल आडवा ठेऊन करावयाचे आहे. व्हिडीओची फाईल साईज 700 एमबी पर्यंत असावी. आधी अन्य कारणासाठी रेकॉर्ड केलेले, आधीच सोशल मीडियावर शेअर झालेले व्हीडीओ नसावे. स्पर्धेसाठीच खास बनविलेला व्हीडीओ पाठविलेला असावा. एकपात्री नाट्य प्रयोग कमीत कमी 2 मिनिटे तर जास्तीतजास्त 5 मिनिटांचा असावा. अभिनय सादर करत असताना निसर्ग, मानव यांचा नाश होईल असे दृश्य नसावे किंवा उपयोगात येणाऱ्या चीज वस्तू आक्षेपार्ह नसाव्या. या नाट्य सादरीकरणात वेशभूषा, रंगभूषा, संगीत इत्यादीचा प्रयोग करू शकतात परंतु तसे ते बंधनकारक नाही. संगीत, स्क्रिप्ट संवाद याबाबत कॉपीराईटची जबाबदारी स्पर्धकाची असेल. स्पर्धेसाठी स्वतंत्र निवड समिती नेमलेली आहे. निवड समितीला 60 टक्के गुण देण्याचे अधिकार असून उर्वरित 40 टक्के मूल्यांकन यूट्युब, फेसबुक सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळालेल्या लाईक्स् यावर विजेत्यांची निवड होईल. त्यात अंतिम निर्णय गांधी रिसर्च फाउंडेशनचा असणार आहे. स्पर्धेसाठी निःशुल्क नोंदणी 15 सप्टेंबर पर्यंत, 20 सप्टेंबर पर्यंत अभिनय व्हिडीओ पाठविणे, 23 सप्टेंबरला व्हिडीओ सोशल मीडियात अपलोड होतील. अपलोड व्हिडीओला 30 सप्टेंबर पर्यंत लाईक्स प्राप्त होतील व विजेत्या स्पर्धकांची 2 ऑक्टोबरला घोषणा व त्याच कार्यक्रमात पारितोषिक वितरण होईल.

व्हिडीओ सादर करण्यासाठी लिंक

स्पर्धेसाठी नोंदणी व व्हिडीओ सादर करण्यासाठी http://www.gandhifoundation.net/GRF_EVT2021/login.php लिंक दिलेली आहे. स्पर्धकांना स्पर्धेच्या काळादरम्यान आयडी क्रमांक व पासवर्ड दिला जाईल. स्पर्धकाने त्याचा वैध इमेल आयडी व मोबाईल क्रमांक पुरवावा. आपला अभिनय सादर करताना स्पर्धकाने ‘गांधी रिसर्च फाउंडेशन आयोजित राष्ट्रीय अभिनय प्रतियोगीता नाव, गाव, तालुका, जिल्हा राज्य, विद्यालय, गट, एकपात्री शीर्षक इत्यादी माहिती देणे आवश्यक आहे. या स्पर्धेसाठी भारतभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धेसाठी 15 सप्टेंबर पर्यंत निःशुल्क नोंदणी करून स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे करण्यात आलेले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पत्नीच्या दीड महिन्याच्या आत्महत्येनंतर दोन जुळ्या मुलांसह पतीचीही आत्महत्या

Next Post

एका जागेसाठी राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर…

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
एका जागेसाठी राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर…

एका जागेसाठी राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर...

ताज्या बातम्या

Share Market Tips : आजच्या बाजारात गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? तज्ज्ञांचे 7 महत्त्वाचे सल्ले

Share Market Tips : आजच्या बाजारात गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? तज्ज्ञांचे 7 महत्त्वाचे सल्ले

March 13, 2026
Gas Booking : युद्धाचे परिणाम...फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

Gas Booking : युद्धाचे परिणाम…फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

March 13, 2026
Breast Cancer

धक्कादायक रिपोर्ट! जंक फूडमुळे भारतात Breast Cancer ४७८% वाढला; प्रत्येक कुटुंबाने जाणून घ्या हा धोका

March 13, 2026
शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

March 13, 2026
Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

March 13, 2026
Jio Financial Services Share: गुंतवणुकीसाठी योग्य वेळ? ब्रोकरेजचा ‘Buy’ सल्ला, 320 रुपयांचे टार्गेट

Jio Financial Services Share: गुंतवणुकीसाठी योग्य वेळ? ब्रोकरेजचा ‘Buy’ सल्ला, 320 रुपयांचे टार्गेट

March 13, 2026
Load More

गारपिटीचा इशारा! राज्यातील 'या' 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

गारपिटीचा इशारा! राज्यातील ‘या’ 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

March 12, 2026

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us