पाचोरा – कुटुंब व समाजातील गतिमंद बालक अथवा व्यक्तीस योग्य प्रकारची वागणूक न देता त्यांचा तिरस्कार करत त्यांना दुर्लक्षित करण्याची मनोवृत्ती जोपासली जात असल्याचे आपण पाहतो अथवा ऐकतो .या गतिमंद बालकांचा येथील गाडगेबाबा शिक्षण संस्थेच्या कालिंदीबाई पांडे मतिमंद विद्यालयात सांभाळ केला जात असून या बालकांना विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन स्वाभिमानी करण्याचे प्रयत्न पांडे परिवार करीत आहे. समाजातील अनेक दानशूर व सामाजिक संवेदना जोपासणाऱ्यां कडून या बालकांसाठी विविध माध्यमातून मदतीचे हात पुढे केले जातात व या पालकां प्रति असलेली आपुलकी व जिव्हाळा सिद्ध केला जातो .येथील डॉक्टर दाम्पत्याने मात्र या गतिमंद बालकांमधील आत्मविश्वासव, जिद्द जागृत व्हावी त्यांना ऐतिहासिक शौर्य कथांचा परिचय व्हावा या हेतूने तान्हाजी चित्रपट दाखविण्याचा खर्च करून या बालकां सोबत डॉक्टर दाम्पत्याने हा चित्रपट बघितला .
येथील सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे डाॅ स्वप्नील पाटील,डॉ ग्रिष्मा पाटील यांनी पांडे विद्यालयातील सर्व गतिमंद बालकांना स्वखर्चाने प्रकाश थिएटर मध्ये तान्हाजी चित्रपट दाखवविण्यासाठी आणले. एवढेच नव्हे तर चित्रपट पाहण्यासाठी आणलेल्या या गतिमंद बालकांचे या डॉक्टर दाम्पत्याने गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. चित्रपटादरम्यान त्यांना बिस्किट व मिठाई देखील देण्यात आली. डॉ स्वप्नील पाटील ,डॉ ग्रिष्मा पाटील या डॉक्टर दाम्पत्याने या गतिमंद बालकांसोबत चित्रपटास उपस्थित देऊन गतीमंद बालकांचा आनंद द्विगुणित केला. डॉक्टर दाम्पत्याच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.