जळगाव, (प्रतिनिधी)- गणपती कोविड हॉस्पिटल करिता सहा डॉक्टरांना वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू होण्याचे आदेश आज जिल्हा शल्य चिकित्सक तथा कोविड-19 चे नोडल ऑफिसर डॉ. एन. एस. चव्हाण यांनी काढले.
येत्या काळात कोरोना रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नसून कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी शासनाने अधिग्रहित केलेल्या गणपती हॉस्पिटल जळगाव करिता वैद्यकीय अधिकारी म्हूणन रुजू होण्यासाठी डॉ. नरेश पाटील(जामनेर), डॉ. विक्रमसिंग घोंगले, (धामणगाव), डॉ. राजेश एस. जैन(बेटावद), डॉ. प्रशांत ठाकूर(वरखेडी,पाचोरा), डॉ. रवींद्र टिके(थोरगव्हाण), डॉ. नसीमा याकूब तडवी(सावखेडा) यांना आदेश काढण्यात आले आहे.
सदर डॉक्टर सध्या ज्या संस्थेत असतील त्या संस्थेतून कार्यमुक्त करण्यात येत असून जिल्हा शल्य चिकित्सक तथा नोडल ऑफिसर कोविड-19, जिल्हा रुग्णालय जळगाव येथे तात्काळ हजर होण्याचे आदेशात म्हटले आहे.















