खुर्चीसाठी हिंदुत्वाला आपल्या सोयीनुसार चालवणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये असा पलटवार भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून केला आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात काल मुख्यमंत्री यांनी अर्वाच्च भाषा एका अभ्यास शून्य भाषणातून केली आहे, राज्य प्रमुख असूनही आपल्या भाषणात एकही सेकंद शेतकऱ्यांसाठी दिला नाही, मग त्या पदाचा काय उपयोग अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून केली असून सोबत ‘सोयीचे हिंदुत्व’या मथड्याखाली लिहलेलं मजकुराचे पोस्टर पण ट्विट केलं आहे.

















