सर्वांगीण विकास असलेला राज्यातील आदर्श मतदारसंघ करण्यासाठी प्रयत्नशील- खासदार उन्मेश दादा पाटील यांचे प्रतिपादन
जळगाव – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आयोजित युवक सप्ताहामध्ये संसदीय कार्य शाळेच्या अंतर्गत आज दुपारी दोन वाजता विद्यापीठाच्या व्यवस्थापन शास्त्र प्रशाला सभागृहात “”चला साधू या खासदारांशी थेट संवाद”” कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यापीठ सिनेट सदस्य मा. दिलीप दादा पाटील, स्कुल ऑफ मॅनेजमेंट संचालक प्रा. डॉ. अनिल डोंगरे, महाराष्ट्र प्रदेश सह मंत्री सिद्धेवर लटपटे, आदित्य नायक, आदेश पाटील, परिमल पाटील सौरभ देसले यांच्यासह मान्यवर प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी ,तसेच एम बी ए ,एमसी व समाजशास्त्र विषयांचे विदयार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय पेट्रोलियम प्राकृतिक गॅस तसेच सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टँडिंग कमिटी सदस्य तथा खासदार उन्मेश दादा पाटील यांनी यावेळी आपल्या राजकीय वाटचालीतील अनुभव कथन केले. आमदार असताना एखादा विषयांवर प्रश्न मांडताना करावयाची कसरत,त्यासाठी करावा लागणारा अभ्यास याविषयी मनोगत व्यक्त केले. लोकसभेतील जळगाव विमानतळाच्या प्रश्न सविस्तर मांडतांना सभागृहात आलेला अनुभव त्यांनी कथन केला.विद्यार्थ्यांनो आपल्या परिस्थितीला दोष न देता आयुष्यात येणारे अडथळे पॉवर जन्माला घालतात हे लक्षात घ्या . आपल्या आई वडीलांनी आपल्या शिक्षणासाठी आर्थिक जमवाजमव करून आपले शिक्षण येथपर्यंत पोहचवले आहे त्यांच्या श्रमाची आणि भावनेची जाण ठेवा. आपल्या हातातील मोबाईल च्या साहाय्याने स्वतः ला अपडेट ठेवा. या साचेबंद शिक्षणासोबत अवांतर वाचनावर भर द्या. भविष्यात माझा विद्यापीठातील सोशल सायन्सचा विद्यार्थी देशात चमकला पाहिजे यासाठी मेहनत घ्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.