Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खान्देशकन्या गायत्री ठाकूर यांची मिस हेरिटेज इंटरनॅशनल २०२३ साठी निवड

najarkaid live by najarkaid live
December 5, 2023
in जळगाव
0
खान्देशकन्या गायत्री ठाकूर यांची मिस हेरिटेज इंटरनॅशनल २०२३ साठी निवड
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : विविधतेत एकता जपणारा हा भारत देश आपल्या हेरिटेज आणि संस्कृतीमुळे नेहमीच विशेष ठरतो. भारताची हीच अनोखी ओळख जपत जळगावची गायत्री ठाकूर हिने मिस हेरिटेज इंडिया २०२२ किताब गेल्यावर्षी पटकावला आहे आणि यावर्षी थायलंड येथे होणाऱ्या  मिस हेरिटेज इंटरनॅशनल २०२३ साठी भारताची हीच अनोखी ओळख जपत राष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान गायत्री ठाकूर हिने पटकावला आहे.

मूळची जळगावची गायत्री ठाकूर ही नृत्यांगना, मॉडेल, थिएटर आर्टिस्ट तसेच मुंबई विद्यापीठातून लोककला पदवीधर आणि जळगावच्या एम. जे. कॉलेज येथून लोकनृत्य पदवीधर आहे. तसेच बराचश्या ब्रँड्ससाठी गायत्रीने मॉडेलिंग केलेली आहे त्यासोबत गायु ठाकूर म्हणून रिल्सच्या माध्यमातून प्रसिद्ध आहे. कॉलेजमध्ये असल्यापासूनच ती लावणी या लोकनृत्याचं सादरीकरण आणि त्याचा जागर करत आलेली आहे.

ब्युटी विथ ब्रेन या थीमवर आधारित मिस हेरिटेज हा एक अनोखा ब्युटी पेजंट आहे.  यात ब्युटी विथ ब्रेन सोबतच हेरिटेजला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. आणि हा अनोखा ब्युटी पेजंट दरवर्षी मृणाल गायकवाड यांच्या मृणाल एन्टरटेन्मेंटकडून आयोजित करण्यात येतो. राष्ट्रीय स्तरावरील हा शो पुणे येथे मागील वर्षी आयोजित केला गेला होता. त्यात जळगावच्या गायत्री ठाकूर हिने तिचा सहभाग नोंदविला होता. ऑडिशन, ग्रूमिंग अशा विविध स्पर्धात्मक फेऱ्यांमध्ये उत्कृष्ट सादरीकरण करून अखेर मिस हेरिटेज इंडिया २०२२ हा विनिंग टायटल आणि मिस फोटोजेनिक हेरीटेज २०२२ हे सबटायटल पटकावून गायत्री ठाकूर ही विजयी मानकरी ठरली.

मिस हेरिटेज इंडिया पेजेंटच्या विजयी उमेदवारांना पुढे इ प्लॅनेट यांच्याकडून आयोजित करण्यात येणाऱ्या मिस हेरीटेज इंटरनॅशनलसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. यावर्षी १८ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर या ९ दिवसाच्या थायलंड येथे होणाऱ्या मिस हेरीटेज इंटरनॅशनल २०२३ ची भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान जळगावच्या मिस हेरीटेज इंडिया २०२२ गायत्री ठाकूर हिला मिळालेला आहे.

मागील वर्षी झालेल्या मिस हेरिटेज इंडिया २०२२ साठी गायत्रीने हेरिटेज सादरीकरणासाठी अजिंठा थीमची निवड केलेली आहे.तिच्या या संपूर्ण प्रवासात आतापर्यंत आणि पुढेही काही लोकांनी तिला विशेष सहकार्य केलेले आहे त्यात ॲड. राजेश झाल्टे यांच्याकडून आर्थिक स्वरूपात मदत तसेच नॅशनल कॉस्च्युम प्रोपसाठी एम आर्ट स्टुडिओ – मुनेश ढाके आणि निखिल सरोदे यांचे सहकार्य लाभलेले आहे. मुख्य फायनलचा एवेनिंग गाऊन हा पुण्यातल्या रविना शहा, शुभ स्टुडिओ यांच्याकडून स्पॉन्सर करण्यात आला आहे. तिचे इतर कॉस्च्युम जळगावच्या डिजायनर जागृती हसवानी यांच्याकडून स्पॉन्सर होत आहे. त्यासोबत आतापर्यंतच्या तिच्या तयारीत आणि शूटमध्ये जळगावची हेअर अँड मेकअप आर्टिस्ट अमृता भोगरे यांचा महत्वाचा वाटा आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अद्वितीय बुद्धीमत्तेचा व कर्तुत्वाचा स्मृतीदीप भारतात कायम तेवत राहील !

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी स्थानिक सुटी जाहीर

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष रेल्वे ; ट्रेन व वेळापत्रक पहा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी स्थानिक सुटी जाहीर

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us