पाचोरा ;- सध्या सुरु असलेल्या संततधार पावसामुळे रस्त्यांची विल्हेवाट लागली असून आज सकाळी तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूल बसला अपघात झाला. सुदैवाने यात कोणत्याही विद्यार्थ्याला दुखापत झाली नाही. खराब रस्त्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या गड्ड्यात गेली. खराब रस्त्यांमुळे वाहन धारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागते.
–
















