Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खबरदार, खाद्यपदार्थ बनवण्यासाठी तेलाचा पुनर्वापर केल्यास कारवाई

Editorial Team by Editorial Team
December 9, 2021
in जळगाव
0
खबरदार, खाद्यपदार्थ बनवण्यासाठी तेलाचा पुनर्वापर केल्यास कारवाई
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जिल्ह्यातील ज्या अन्न व्यासायिकांचा खाद्य तेलाचा वापर प्रतिदिवस 50 लिटरपेक्षा अधिक आहे, अशा व्यावसायिकांसाठी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत नियम आहेत. त्यानुसार संबंधितांनी तेलाचे रेकॉर्ड ठेवणे आवश्यक आहे. तसेच तळलेल्या तेलाचा पुनर्वापर टाळावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी म्हटले आहे, खाद्य पदार्थ तळण्यासाठी वापरण्यात येणारे तेल हे फक्त एकदाच तळणासाठी वापरावे. त्यानंतर पुढील दोन दिवसांत या तेलाचा वापर करून संपवावे. जर ते आपण पुन्हा तळण्यासाठी वापरले, तर त्यातील पोलर कंपाऊंडचे व ट्रान्सफॅटचे प्रमाण वाढून ते आरोग्यावर विपरीत परिणाम करते. मुख्यत्वे सर्व वयोगटातील लोकांना तळलेले पदार्थ हे आकर्षित करतात. मुख्यत्वे कचोरी, समोसा, भजे, वडे, पाणीपुरी यासारख्या अन्न पदार्थाची मोठी मागणी असते. हे खाद्यपदार्थ सहज उपलब्ध असतात.

अन्न पदार्थ तळण्याकरीता वापरले जाणारे तेल हे पुन्हा- पुन्हा तळण्यासाठी वापरले गेले, तर त्यामध्ये पोलर कंपाऊंडस व bad cholesterol ट्रॉन्सफटचे प्रमाण वाढून त्यापासून हृदयविकार, कोलोन कॅन्सरचा धोका असतो. तसेच पंचनसंस्थेसंबंधी विकार उदभवण्याचा धोका असतो. त्यामुळे खाद्ययतेल पुनर्वापराबाबत काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.

खाद्य तेलाचा तळण्यासाटी वापर करताना गॅस हा कमी आचेवर ठेवा म्हणजेच तेलामधून धूर येणार नाही याची काळजी घ्यावी. तळण्यासाठी शक्यतो स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचा वापर करावा, लोखंडी कढईचा वापर टाळावा. तळताना तेलात जमा झालेले अन्न कण हे वारंवार तळून काळे होण्यापूर्वीच लगेचच काढावेत. तळलेल्या तेलाचा पुनर्वापर टाळावा. शिल्ल्की राहिलेले तेल हे पुढील दोन दिवसातच भाजीला फोडणी घालण्यासाठी वापरुन संपवावे.

लहान- मोठ्या अन्न व्यवसायिकांनी म्हणजे ज्यांचा तेलाचा वापर प्रतिदिन 50 लिटरपेक्षा जास्त आहे अशा व्यावसायिकासाठी अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र शासन या विभागामार्फत राबविल्या जाणा-या अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत काही नियम आहेत. मोठ्या अन्न व्यावसायिकांनी ते दररोज वापरत असणा-या तेलाचे रेकार्ड ठेवणे आवश्यक आहे. तसेच वापरुन किती तेल शिल्ल्क, शिल्लक राहिलेले तेलाची विल्हेवाट कशी लावली किंवा शिल्लक तेल हे कोणत्या नोंदणीकृत बायेडिझेल उत्पादकाला दिले त्यासंबंधी पूर्ण नोंदी ठेवणे आवश्यक आहे. तसे न केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे.

त्याचप्रमाणे तळण्यासाठीचे खाद्यतेलाचा पुनर्वापरावर निर्बंध घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या जिल्हा कार्यालयामार्फत संबंधित अन्न व्यावसायिकांकडे जावून तपासणी करण्यात येते. टीपीसी मीटरच्या साह्याने तळण्यासाठी वापरत असलेल्या तेलाची तपासणी करुन जर TPC हे 25 टक्यांतूपेक्षा जास्त असेल तर अन्न व्यावसायिक पुढील कायदेशीर कारवाईस पात्र ठरतात, असेही सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन यांनी म्हटले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

१० वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी ; येथे करा अर्ज

Next Post

Jio ने लॉन्च केला सर्वात स्वस्त प्लान, यूजर्सना मिळतील अनेक फायदे

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
Jio ने लॉन्च केला सर्वात स्वस्त प्लान, यूजर्सना मिळतील अनेक फायदे

Jio ने लॉन्च केला सर्वात स्वस्त प्लान, यूजर्सना मिळतील अनेक फायदे

ताज्या बातम्या

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

February 25, 2026
रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

February 25, 2026
Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

February 25, 2026
7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

February 25, 2026
हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

February 25, 2026
Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us