जळगाव, (प्रतिनिधी) – माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या आयोजित बैठकीत तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील यांनी गैरहजर होते तर इतरही तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली.
एकनाथ खडसे यांनी भाजपाला राम राम ठोकल्यानंतर जळगाव जिल्ह्यात भाजपने तालुका स्तरावर बैठकांचा सपाटा लावला आहे. गेल्या दोन दिवसात भाजपनं घेतलेल्या बैठकांमधून सांगितलं जातंय की खडसे गेल्याने काहीच फरक पडणार नाही परंतु खडसेंच्या बालेकिल्ल्यात मात्र आज पदाधिकाऱ्यांच्या गैरहजेरीने बरंच काही स्पष्ट केल आहे असं बोललं जातं आहे.
मी नाथाभाऊ सोबत – मुक्ताईनगर भाजपा तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील
मुक्ताईनगर येथील भाजपच्या आयोजित बैठकीला गैरहजर असल्याबाबत भाजपच्या तालुका अध्यक्षांना ‘नजरकैद’ प्रतिनिधीने विचारलं असता ते म्हणाले की मी नाथाभाऊ सोबत… मला इतर कामं असल्यानं मी बैठकीला गेलो नाही.. आणि बैठकीला इतर कोणीही प्रमुख पदाधिकारी नव्हते असं त्यांनी बोलतांना सांगितलं.