Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोविड संसर्गाच्या काळात नवजात बालक व मातांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक

आरोग्य विभाग, युनिसेफच्या वतीने नवजात शिशु सप्ताहानिमित्त आयोजित परिसंवादात तज्ञांचे मत

najarkaid by najarkaid
November 18, 2020
in आरोग्य
0
कोविड संसर्गाच्या काळात नवजात बालक व मातांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, दि. १८ : कोविड संसर्गाच्या काळात नवजात बालक व मातांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच या काळात नवजात शिशु व माता मृत्यूदर कमी करण्यासाठी गर्भवती महिलेचे आरोग्य व पोषण आहार, रुग्णालयातील सुविधा व निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यावर लक्ष देणे आवश्यक आहे. माता व नवजात शिशु मृत्यूदर कमी करण्यासाठी शासनाबरोबर सामाजिक, स्वयंसेवी संस्थांनीही पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत आरोग्य विभाग, युनिसेफच्या वतीने नवजात शिशु सप्ताहानिमित्त आयोजित परिसंवादात व्यक्त केले गेले.

महाराष्ट्र शासनाचे आरोग्य विभाग, युनिसेफ यांच्यावतीने राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताहानिमित्त ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादातील चर्चेनंतर सहभागी संस्थांच्या वतीने डॉ. मृदुला फडके यांनी संयुक्त निवेदन सादर केले.

डॉ. मृदुला फडके म्हणाल्या, पाच वर्षाखालील बालकांचे तसेच मातांचे मृत्यू दर कमी करण्यात महाराष्ट्राने चांगली प्रगती केली आहे. सन 1997 ते 2016-18 या दरम्यान राज्यातील माता मृत्यू दर हा 166 वरून 46 एवढा खाली आला आहे. तर पाच वर्षाखालील बालकांचा मृत्यू दर हा सन 2007 ते 2018 दरम्यान 42 वरून 22 वर आला आहे. माता मृत्यू व बालक मृत्यू दर आणखी खाली आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी चांगल्या आरोग्य सुविधा, प्रसुती केंद्रातील सुविधांचा दर्जा राखणे, नवजात बालक केअर युनिटची सोय, सर्वच बालकांना समान सोयी आदींवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. प्रसुती खोलीत गर्भवती महिलेची व नवजात शिशुची योग्य ती काळजी घेतली जावी.

कोविड काळात गर्भवती महिला, नवजात बालके व मातांची योग्य काळजी घेण्यात यावी. सर्व आरोग्य विषयक यंत्रणांनी प्रसुतीच्या वेळी संरक्षणात्मक उपकरणे पुरवावीत तसेच शारीरिक अंतर राखणे, मुखपट्टी वापरणे, वारंवार हात धुणे, श्वसनसंबंधी स्वच्छता राखणे आदी काळजी सर्वच संबंधितांनी घ्यावी. यासाठी सामाजिक संस्था, आरोग्य विषयक काम करणारे व्यावसायिक व आरोग्य यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन या संयुक्त निवेदनात करण्यात आले आहे.

यावेळी डॉ. राजेश्वरी चव्हाण यांनी महिलांच्या विशेषतः गर्भवती महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे माता मृत्यू व बाल मृत्यू होत असल्याचे सांगितले. त्यासाठी महिलांनी ॲनिमिया दूर करून आरोग्याकडे लक्ष द्यावे. कोविड काळात महिलांमध्ये जनजागृतीसाठी आरोग्य विभाग, युनिसेफ यांच्या सहकार्याने विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. केईएम हॉस्पिटलमध्ये सायकोसोशल सपोर्ट सेंटरच्या माध्यमातून नागरिकांचे मानसिक प्रबोधन करण्यात येत असल्याचे श्रीमती चव्हाण यांनी सांगितले.

गायनॅकोलॉजिस्ट असोसिएशनच्या डॉ. नंदिता पालशेतकर म्हणाल्या की, कोविड काळात माता व नवजात शिशुंची काळजी घ्यावी लागणार आहे. प्रधानमंत्री मातृत्व अभियानाच्या माध्यमातून खासगी डॉक्टरही प्रबोधन करत आहेत.

नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. एल.एस देशमुख म्हणाले, नवजात बालक मृत्यू दर कमी करण्यासाठी कांगाऊ मदर केअर संकल्पना राबविण्यात यावी. तसेच आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण द्यावे. जेणेकरून बालक जन्मल्यानंतर पहिल्या काही तासात त्याची योग्य ती काळजी घेतली जाईल.

पेडियाट्रिशियन प्रा. प्रमोद जोग म्हणाले की, वेळेपूर्वीच बालकांचा जन्म, विषाणू संसर्ग यामुळेही बालमृत्यू होत आहेत. हे मृत्यू टाळण्यासाठी बालक व मातांमधील प्रतिकार शक्ती वाढविण्यावर भर द्यायला हवा. डॉ. अपर्णा श्रोत्री यांनीही परिसंवादात सहभाग घेतला. युनिसेफच्या स्वाती मोहपात्रा व खणेंद्र भुयान यांनी परिसंवादाचे संचालन केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उल्हासनगर महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता पदाच्या १२ जागांची पदभरती

Next Post

चैत्यभूमी येथे गर्दी न करता लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे दर्शन घेण्याचे आवाहन

Related Posts

Fake Paneer – बनावट पनीर ओळखण्याचे मार्ग व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Fake Paneer – सावधान! तुम्ही खात असलेलं पनीर बनावट तर नाही? ओळखण्याची सोपी चिन्हं

August 17, 2025
homeopathy sugar pills : होमिओपॅथी गोळ्या कशापासून बनतात?

homeopathy sugar pills : होमिओपॅथी गोळ्या कशापासून बनतात?

August 6, 2025
Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा 'हे' १० नियम

Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा ‘हे’ १० नियम

August 3, 2025
Nuga best

Nuga best : फ्री फ्री फ्री! आता जळगाव शहरात नूगा बेस्ट थेरपी पूर्णतः मोफत!

July 25, 2025
male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय... पण खरं आहे!

male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय… पण खरं आहे!

July 23, 2025
स्थूलता आणि शरीरावर होणारे परिणाम

Obesity and Breathing Problems: स्थूलतेमुळे परिणाम? – MRI विश्लेषणातून उलगडले!

July 22, 2025
Next Post
चैत्यभूमी येथे गर्दी न करता लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे दर्शन घेण्याचे आवाहन

चैत्यभूमी येथे गर्दी न करता लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे दर्शन घेण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us