जळगाव,(विशेष प्रतिनधी)- जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा हाहाकार सुरु असतांना आपत्कालीन परिस्थितही बहुतांशी ठिकाणी ग्रामसेवक हेडकॉटरला गैरहजर राहत असून मर्जी प्रमाणे दोन तीन दिवसाआड ग्रामपंचायतीला हजेरी लावून गावाचा कारभार हाकत आहे.यामुळे बाहेर गावावरून आलेले नागरिकांची विलगीकरण कक्षात न ठेवता थेट गावात उघड उघड फिरत असल्याने कोरोना संसर्ग वाढीचा धोका निर्माण होत आहे.
लॉकडाऊन काळात बाहेर गावावरून ग्रामीण भागात नागरिकांचा येण्याचा ओघ सुरूच असून बाहेर गावावरून आलेल्या नागरिकांची तपासणी करून त्यांना सर्दी, खोकला व इतर लक्षणे असल्यास चौदा दिवस कोविड विलगीकरण कक्षात ठेवण्याचे शासनाने निर्देश आहेत.काही ठिकाणी ग्रामसेवक व पोलीस पाटील यांनी असे विलगीकरण कक्ष स्थापन करून शासनाच्या निर्देशांचे पालन होतांना दिसत आहे.कुठलेच लक्षणे नसतील अशा नागरिकांना “होम कॉरंटाईन” च्या सूचना प्रशासनाकडून देण्याचे निर्देश आहेत. मात्र बहुतांशी गावात ग्रामसेवक हेडकॉटर ला राहताच नसल्याने या नागरिकांना सूचना कोण देणार अशी परिस्थिती निर्माण झाल्याने बाहेर गावावरून आलेले नागरिक गावात बिनधास्त फिरत आहे.ग्रामसेवक मात्र आठवड्यातून दोन वेळा ग्रामपंचायतला येऊन गावाचा कारभार चालवण्यात धन्यता मानत आहे.
हेडकॉटरला थांबणे आवश्यक
ग्रामसेवक यांनी सेवेत असलेल्या गावात हेडकॉटर ला थांबणे शासन निर्णया नुसार आवश्यक असतांना देखील कोरोना संसर्गाच्या आपत्कालीन काळातही अनेक ग्रामसेवक हेडकॉटरला थांबत नसल्याने बाहेर गावावरून गावात येणाऱ्या नागरिकांची प्रशासनाला अचूक माहिती मिळू शकत नाही.बाहेर गावावरून आलेले नागरिक थेट गावात वावरतांना दिसत आहेत यामुळे कोरोना संसर्गाचा धोका ग्रामीण भागात वाढू शकतो.कोरोना सारख्या आपत्कालीन परिस्थिती मध्ये देखील हेडकॉटर ला न थांबणाऱ्या ग्रामसेवकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिक करीत आहे.
ग्रामसेवकांना हेडकॉटर थांबण्याच्या सूचना – श्री.बोटे
कोरोना संसर्गाच्या आपत्कालीन काळात ग्रामसेवक हेडकॉटर ला राहत नाहीत या बाबत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.बोटे यांना विचारले असता ते म्हणाले की ग्रामसेवकांना हेडकॉटरला राहण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.तरी देखील काही ग्रामसेवक राहत नसतील तर चौकशी करू व कारवाई करू असे श्री.बोटे यांनी सांगितले.