Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्तव्य बजावतांना मरण पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना हुतात्मा निधीतून 10 लाख रुपयांची मदत

najarkaid live by najarkaid live
May 27, 2020
in जळगाव
0
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्तव्य बजावतांना मरण पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना हुतात्मा निधीतून 10 लाख रुपयांची मदत
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 27  – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्तव्य बजावतांना मरण पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना हुतात्मा निधीतून 10 लाख रुपयांची मदत देण्यात येत आहे. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज जळगाव येथे आयेाजित पत्रकार परिषदेत दिली.
येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत गृहमंत्री बोलत होते. याप्रसंगी आमदार अनिल पाटील, माजीमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, रविंद्र पाटील आदिंसह माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्यातील पोलीसांना विविध रुग्णालयांमध्ये उपचारादरम्यान सहाय्य मिळण्यासाठी 20 एप्रिलपासून कोविड-19 हेल्पलाईन (9132953295) सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून प्रशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्यांद्वारे समुपदेशन व मार्गदर्शन केले जात आहे. याअंतर्गत 10 मे, 2020 पर्यंत 170 कॉल प्राप्त झाले आहेत. पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी पोलीस महासंचालक कार्यालयाकडून 1.5 लाख N-95 मास्क, 6 लाख थ्री प्ले मास्क असे एकूण 7.5 लाख मास्क, 25 हजार लिटर सॅनिटाझर, 22 हजार फेस शिल्ड, 44 हजार हँडग्लोज व ड्रोन अशा एकूण 4 कोटी रूपयांच्या साधनसामग्रीचे वाटप करण्यात आलेले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्तव्य बजावतांना पोलीसांचे आरोग्य अबाधित रहावे, यासाठी सर्व पोलीस स्टेशन प्रभारींना पोलीस कल्याण निधीतून सॅनिटायझर, गॉगल्स, पीपीई किट खरेदीचे अधिकार देण्यात आलेले आहेत. कोरोना विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी प्रतिकारशक्ती चांगली असणे आवश्यक आहे. याकरीता सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना रोग प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या आर्सेनिक-30 व कॅम्पर-1 एम या व्हिटॅमिन सी आणि डी च्या गोळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. कोरोना बाधित पोलीसांना पोलीस कल्याण निधीतून 1 लाख रुपये अग्रिम स्वरूपात अदा करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आतापर्यंत कल्याण निधीतून 3 कोटी रक्कम कोरोना बाधित पोलीसांना अग्रीम स्वरुपात देण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजनेंतर्गत कोविड-19 प्रतिबंधात्मक साहित्य खरेदीसाठी कार्यालयीन खर्च या शिर्षकाखाली 9 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे. कोरोना बाधित पोलीसांना महाराष्ट्र कुटुंब आरोग्य योजनेंतर्गत नामांकित हॉस्पिटलमध्ये रोकडरहित (Cashless) उपचार केले जात आहेत. या योजनेंतर्गत राज्यातील धुत अँड एजीएम हॉस्पिटल औरंगाबाद, हॉरिझॉन हॉस्पिटल, ठाणे,आदित्य बिर्ला अँड डि वाय पाटील हॉस्पिटल, पिंपरी-चिंचवड या दवाखान्यांमध्ये इलाज सुरू आहेत. या दवाखान्यांमध्ये कोरोना विषाणूचे बाधित पोलीसांच्या उपचाराकडे जातीने लक्ष देवून त्यांचेवर योग्यप्रकारे उपचार करण्यात येत आहेत. प्रत्येक विभागात कोविड कक्षाची स्थापन करण्यात आली असून कोरोना बाधित पोलीसांची योग्यरित्या काळजी घेता यावी म्हणून त्यांच्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि राज्यातील पोलीसांना कोरोनाची झालेली लागण या पार्श्वभूमीवर 50 वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे संसर्गजन्य जागी कर्तव्य न देण्याचा व 55 वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांना रजा देण्याचा महत्वपूर्ण निर्णयही राज्य शासनाने घेतला असल्याचे गृहमंत्री श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.
कोरोनाचे संकट टाळण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय यंत्रणा एकदिलाने काम करीत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्कीनिंग वाढविण्याच्या सुचना प्रशासनास दिल्या आहेत. त्याचबरोबर आंगणवाडी सेविका, अशावर्कर यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेची तपासणी करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर लॉकडाऊन सुरु झाल्यापासून सर्व धर्मियांचे सण, उत्सव अत्यंत साधापण्याने साजरे करण्यात येत असल्याबद्दल गृहमंत्र्यांनी सर्वधर्मिय गुरुंचे अभिनंदन करुन आभारही मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पारोळा येथील एक जण कोरोना पॉझिटिव्ह

Next Post

जळगावकरांनो, ताप व श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्वरीत नजिकच्या डॉक्टरांना दाखवा – जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जळगावकरांनो, ताप व श्वास घेण्यास त्रास होत असल्यास  त्वरीत नजिकच्या डॉक्टरांना दाखवा  – जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

जळगावकरांनो, ताप व श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्वरीत नजिकच्या डॉक्टरांना दाखवा - जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

March 14, 2026
जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

March 14, 2026
ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

March 14, 2026
केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us