वरणगावं(अंकुश गायकवाड):- कोरोना महामारी मुळे देशोधडीला लागलेल्या कैकाडी समाजातील कुटुंबियांस प्रति महिना पाच हजार रुपये आर्थिक मदत करा असे निवेदन कैकाडी समाज आघाडीचे संस्थापक एडवोकेट शिरीष जाधव यांनी केले आहे महाराष्ट्रातील कैकाडी समाज हा विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गात मोडतो मात्र सदरील समाज हा अत्यंत गरीब व हलाखीचे जीवन जगत आहे आजही ही विकासाची गंगा समाजापर्यंत पोहोचलेली नाही परंपरागत पाट्या टोपल्या बनवणे गाढवावर माती वाहने हे पारंपारिक व्यवसाय पूर्णपणे बुडालेले आहेत अशा या परिस्थितीत कैकाडी समाजाला मोलमजुरी केल्याशिवाय पर्याय नाही वते मोलमजुरी करूनच आपले जीवन जगत आहेत परंतु मागील बावीस मार्च 2020 पासून लॉक डाऊन जाहीर झाला तेव्हापासून आजपर्यंत सगळा समाज घरीच बसलेला आहे उत्पन्नाची कोणतेही साधने नाहीत म्हणून या समाजावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे तसेच भटक्या विमुक्त प्रवर्गातील सर्व समाजाची अशीच अवस्था झाली आहे त्यामुळे आपणास कळकळीची विनंती आहे की कोरोनाव्हायरस संपूर्ण नायनाट होत नाही तोपर्यंत तसेच जनजीवन पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत कैकाडी समाजातील गरीब कुटुंबांना प्रति महिना पाच हजार रुपयाची आर्थिक मदत करून दिलासा द्यावा हा गरीब समाज आपल्याकडे आशेने बघत आहे अशा प्रकारचे निवेदन अखिल भारतीय कैकाडी समाज आघाडीचे संस्थापक एडवोकेट शिरीष जाधव यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्याकडे केली यावेळी राज्याध्यक्ष रवींद्र गायकवाड,राज्य संघटक सुनील जाधव आदींची उपस्थिती होती.















