कोरोना बधितांच्या अंत्यसंस्काराचे व्हिडीओ व्हायरल होण्यापासून थांबवा अशी विनंती करणारं पत्र कोरोना संसर्ग झालेल्या पत्रकार मिलिंद सोनवणे यांनी आज चोपडा तहसीलदारांना व्हाट्सअप वर पाठवले आहे ते पत्र जशाचे तसे वाचा…
साहेब,चोपडा तालुक्यातील कोरोनाच्या पेशंट ची संख्या वाढत आहे,त्यातल्या त्यात तरुण कुटुंब प्रमुख पुरुष महिला ह्या दुर्दवी मृत्यु पावत आहेत,आणि सर्वतोपरी राजकीय, सामाजिक,आणि आरोग्य विभाग,प्रशासनाच्या वतीने भरपूर प्रयत्न केले जात आहेत.पण घराघरात कोरोनाग्रस्त लोक आहेत कोणी हॉस्पिटल्स ला तर कोणी होम क्वारंटाइन आहेत,जो तो त्याच्या परिने जीव वाचविण्यासाठी जीवांचा आटा पीटा करीत आहे.
पण मला एक अतिमहत्वपूर्ण सांगावेसे वाटते की माझ्या घरात ही लहान चिमुकल्या सहित सर्व आम्ही कोरोना ग्रस्त आहोत,आणि म्हणून सर्वत्र जे चित्र आपण व्हाट्सएप, इंस्टाग्राम, फेसबुक, आणि स्टेटस,आणि सोशल मीडिया वर चोपडा येथील,जे रुग्ण मरण पावत आहेत,त्यांचे फ़ोटो,त्यांचे VDO त्यात अंत्यविधीचे,आणि अमरधाम येथे त्यांचे शव जाळताना चां VDO वारंवार काही लोक दाखवत आहेत.
तर महोदय जे रुग्ण हॉस्पिटल ला जीवन मृत्यु शी झुंझत आहेत,लढा देत आहेत तर त्यांच्या मोबाइल वर ते कोणत्या न कोणत्या प्रकारे जात आहेत,तर त्यांची मनस्थिति खचत आहे,त्यांची हिम्मत कमी होत आहे,आणि काही लोक तर मला वाटते की ते हे सर्व बघून च आपली जीवन यात्रा संपवत आहेत,तर मला असे वाटते की तुम्ही आ.महोदय अश्या बातम्या अश्या व्हिडीओवर शासनाच्या वतीने बंदी आणावी, आणि अश्या विचित्र मनस्थिती च्या लोकांवर ही कार्रवाई केली पाहिजे.अशी आपणास विनंती करतो.
कारण महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचा भस्मासुर हा जळगाव जिल्ह्यात आहे,आणि त्यातल्या त्यात चोपडा तालुक्यात आहे.म्हणून मला लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या वाइट प्रवृतीच्या लोकांचा बंदोबस्त करावा अशी विनंती.
आपला विश्वासू
मिलिंद सोनवणे















