वरणगाव, (प्रतिनिधी)- कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेल्या भागात सर्वेक्षण सुरु असून हा भाग पूर्णपणे सील करण्यात येत असून शहरात दर आठ दिवसांनी निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी देखील करण्यात येत आहे.लॉकडाऊनही नागरिक शिस्तीने पाळत असून प्रशासना नागरिकांचे सहकार्य मिळत असल्याचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी “दैनिक नजरकैद” शी बोलतांना सांगितले.
शहरात गेल्या काही दिवसात चार रुग्ण आढळून आल्याने गंगाराम कॉलनी, गीदाडी आखाडा, आक्सा नगर, गंगाराम कॉलनी या भागात सर्वेक्षण करून लक्षणे असणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. या संपूर्ण परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली आहे.
नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असे अवाहन नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केले आहे.