जळगाव (विशेष प्रतिनिधी)- ज्यांच्याकडे केशरी कार्ड आहे त्या केशरी कार्डची नोंद तहसील कार्यालयाच्या युनिट रजिस्टर ला असल्यास त्या केशरी कार्ड धारकांना कार्ड ऑनलाईन असो की ऑफलाईन असो धान्य मिळणार आहे मात्र धान्य घेण्यासाठी केशरी कार्ड दाखवावे लागेल व तहसीलच्या युनिट रजिस्टरला या कार्डची नोंद असणे आवश्यक आहे असे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी ‘दैनिक नजरकैद’ शी बोलतांना सांगितले आहे.
केशरी रेशन कार्ड आहे, मग ते ऑनलाईन आहे किंवा नाही हे माहीत नाही. पण सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धान्य मिळणार या आशेवर अनेक कुटुंब विसंबून आहेत. त्यांनी दुकानदारांकडे चौकशी केली असता तुमचे कार्ड ऑनलाईन नसल्याची उत्तरे मिळू लागलेली आहेत रेशनचे धान्य नाकारल्याच्या अनेक तक्रारी जिल्ह्यात समोर येत आहे. जर लाभार्थ्यांचे रेशन कार्डला बारा अंकी नंबर नसेल आणि कार्ड ऑफलाईन असले तरी आता या लाभार्थ्यांना रेशनचे धान्य मिळण्याचा मार्ग शासनाने मोकळा केल्याच्या निर्णयामुळे अनेक लाभार्थ्यांना याचा लाभ मे व जून महिन्यात मिळणार आहे. रेशन दुकानदारांनी मात्र अशा लाभार्थ्यांना धान्य देण्यासाठी तत्परता दाखवणे अपेक्षित आहे.
tausifshaikh371669@gmail.com
Khirwad ta raver dst jaljaon
Maze reshan card
Plz helf
My ration card is not available then please check the my ration card is available or not.
This is nice app