मुंबई: जर तुम्ही सुद्धा तुमच्यासाठी पेन्शन योजना घेण्याचा प्लान करत असाल तर भारतीय आयुर्विमा महामडळ म्हणजेच LIC ने तुमच्यासाठी एक जबरदस्त प्लान घेऊन आले आहे. पॉलिसीचे नाव सरल पेन्शन योजना असे असून यात तुम्हाला पॉलिसी घेताना केवळ एकदाच प्रीमियम भरावा लागेल आणि यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहिल. एलआयसी सरल पेन्शन योजना हा एक सिंगल प्रीमियम प्लॅन आहे. 1 जुलैपासून ही योजना सुरु झाली आहे.
सरल पेन्शन स्कीमचे दोन प्रकार
एलआयसी सरल पेन्शन स्कीमचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे लाइफ अॅन्युइटी विथ 100% रिटर्न ऑफ परचेस प्राईस आणि दुसरी पेन्शन योजना म्हणजे संयुक्त जीवन. सिंगल लाईफ पॉलिसी ही एकाच व्यक्तीच्या नावावर असेल. त्यामुळे पेन्शनधारक जिवंत असेल तोपर्यंत त्याला पेन्शन मिळत राहील. तर संयुक्त जीवन योजनेत पती-पत्नी अशा दोघांना कव्हर केले जाईल. या दोघांपैकी कोणीही शेवटपर्यंत जिवंत राहील त्याला पेन्शन मिळत राहील. दोघांचाही मृत्यू झाला तर वारसदाराला बेस प्राईसचे पैसे मिळतील.
सरल पेंशन योजनेची वैशिष्ट्ये
– विमाधारकासाठी पॉलिसी घेताच त्याची पेन्शन सुरू होईल.
– मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक पेन्शन घेऊ शकता.
– ही पेन्शन योजना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने घेता येऊ शकते.
– या योजनेत 12000 रुपये वर्षाचे किमान लावाले लागतील. यात कमाल मर्यादा नाही.
– तुम्ही 40 ते 80 वर्षाच्या वयात कधीही एकरक्कमी पैसे जमा करून मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक पेन्शन घेऊ शकता. ही पेन्शन आयुष्यभर मिळेल.
– शिवाय पॉलिसी सुरू झाल्याच्या 6 महिन्यानंतर कर्जाची सुद्धा सुविधा आहे.
किती पेन्शन मिळेल?
आता प्रश्न उद्भवतो की या सरल पेन्शन योजनेसाठी आपल्याला किती पैसे द्यावे लागतील, तर हे आपल्यालाच निवडावे लागेल. म्हणजेच आपण ज्या रकमेची पेन्शन निवडाल त्यानुसार पैसे द्यावे लागतील. तुम्हाला दरमहा पेन्शन पाहिजे असल्यास किमान 1000 रुपये पेन्शन घ्यावी लागेल, तीन महिन्यांसाठी 3000 रुपये, 6 महिन्यांसाठी 6000 रुपये आणि 12 महिन्यांसाठी 12000 रुपये पेन्शन घ्यावी लागेल. कोणतीही जास्तीत जास्त मर्यादा नाही.