Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कृषि निविष्ठा विक्रेत्यांसाठी कृषि विस्तार सेवा पदविका अभ्यासक्रमास  जैन हिल्स येथे आरंभ

najarkaid live by najarkaid live
January 10, 2022
in जळगाव
0
कृषि निविष्ठा विक्रेत्यांसाठी कृषि विस्तार सेवा पदविका अभ्यासक्रमास  जैन हिल्स येथे आरंभ
ADVERTISEMENT

Spread the love

जैन हिल्स येथे कृषि आणि कृषिसंबंधीत एक वर्षीय डिप्लोमा अभ्यासक्रमाचे उद्घाटन करताना डॉ संजीव पाटील,  आत्माचे संचालक मधुकरराव चौधरी, जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, डॉ. बालकृष्ण, गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक डॉ. आश्विन झाला, गीता धरमपाल,  पी.के. पाटील, डॉ. एच.टी. पाटील, वाकोद गौराई कृषितंत्र निकेतनचे प्राचार्य चौधरी, ए.एम. पाटील, कुरबान तडवी आदी मान्यवर
जळगाव, दि. 10 ( प्रतिनिधी) – ‘आपल्याकडील ज्ञान दिल्याने वाढते, त्या ज्ञानाच्या सहाय्याने आपली प्रगती होतेच परंतु ज्यांना आपण ज्ञान देतो त्यांची देखील प्रगती होते. जिल्ह्यातील कृषि निविष्ठा विक्रेत्यांसाठी पदविका अभ्यासक्रम (DAESI) हा खूप उपयुक्त ठरेल.’ असा विश्वास तेलबिया संशोधन केंद्र जळगावचे प्रिंन्सीपल सायंटीस्ट डॉ. संजीव पाटील यांनी व्यक्त केला. त्यांच्याहस्ते जैन हिल्स येथे कृषि निविष्ठा विक्रेत्यांसाठी कृषि विस्तार सेवा पदविका  (DAESI) अभ्यासक्रमाची सुरवात नुकतीच झाली त्या प्रसंगी ते बोलत होते.
त्यावेळी व्यासपीठावर आत्माचे संचालक मधुकरराव चौधरी, जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, डॉ. बालकृष्ण, गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक डॉ. आश्विन झाला, गीता धरमपाल, कृषि विभाग माजी उपसंचालक पी.के. पाटील, माजी बाजरी पैदासकार डॉ. एच.टी. पाटील, उपसंचालक  कुरबान तडवी, कृषिविज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ किरण मांडवडे, वाकोद येथील गौराई कृषितंत्र निकेतनचे प्राचार्य देवेंद्र चौधरी, एच.एस. महाजन (DAESI फॅसिलिटेटर), गौराई कृषितंत्र निकेतनचे  ए.एम. पाटील (फॅसिलिटेटर),  यांची उपस्थिती होती.
जैन हिल्स येथे कृषि आणि कृषिसंबंधीत एक वर्षीय डिप्लोमा कार्यक्रमात आरंभ झाला. वर्षभर चालणाऱ्या डिप्लोमासाठी जिल्ह्यातील सुमारे 40 प्रशिक्षणार्थी सहभागी झालेले आहेत. आठवड्याला एक दिवस असे 50 आठवड्यांचा हा कालावधी असेल. भवरलाल अॅण्ड कांताबाई फाऊंडेशन, गांधीतीर्थ, या संस्थांच्या संयुक्तविद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
डॉ. आश्विन झाला यांनी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत केले. जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी खेड्याकडे चला या महात्मा गांधीजींच्या विचारानुसार ग्रामविकासाच्या दृष्टीने कृतिशील प्रयोग केले, महात्मा गांधीजीं व कस्तुरबा यांच्या 150 जयंतीच्या औचित्याने भारतातील दत्तक घेतलेल्या 150 गावांच्या प्रकल्पाबाबत माहिती दिली.
जैन इरिगेशन वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ अनिल ढाके यांनी जैन हिल्सची निर्मिती कशी झाली तसेच कृषि क्षेत्रातील उच्च कृषितंत्रज्ञान व शेतकऱ्यांची प्रगती याबाबत माहिती दिली. जैन इरिगेशनच्या कृषि उच्चतंत्रज्ञानामुळे शेती, शेतकरी यांची प्रगती झालेली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे.
उपसंचालक कुरबान तडवी यांनी पदविका अभ्यासक्रमाबाबत संपूर्ण वर्षात घेतल्या जाणाऱ्या तासिका, प्रात्यक्षिके याबाबत सविस्तर माहिती दिली. ‘मी कृषिकेंद्राचा संचालक आहे,  मला सर्व माहिती आहे या भ्रमात न राहता आपण डिप्लोमाचे विद्यार्थी आहोत व आपल्याला शिकायचे आहे, येथील शिस्त पाळावी व जमले तर ड्रेसकोड देखील ठरवा..’ याबाबत आत्माचे संचालक मधुकर चौधरी यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी गीता धरमपाल,  यांनी देखील सुसंवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौराई कृषितंत्र विद्यालयाचे प्राचार्य देवेंद्र चौधरी यांनी केले. या उपक्रमासाठी गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक उदय महाजन, व्ही.के. बोरोले तसेच फॅसिलिटेटर एच.एस. महाजन यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सोने-चांदीच्या किंमतीत घसरण, जाणून घ्या प्रति तोळ्याचा दर

Next Post

जिओ ग्राहकांना मोठी भेट! या प्रीपेड रिचार्ज प्लॅनवर मिळतोय 20% कॅशबॅक

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जिओचा सर्वात स्वस्त प्लान, दररोज 3GB डेटासह बरेच काही

जिओ ग्राहकांना मोठी भेट! या प्रीपेड रिचार्ज प्लॅनवर मिळतोय 20% कॅशबॅक

ताज्या बातम्या

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

February 26, 2026
एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

February 26, 2026
Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

February 26, 2026
SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

February 26, 2026
मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us