नवी दिल्ली: कलम ३७० हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती नेमकी कशी आहे हे पाहण्यासाठी युरोपीयन संघाच्या प्रतिनिधींना परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर काँग्रेससह विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. ‘भाजपचा हा राष्ट्रवाद अजबच आहे,’ अशी खोचक टिप्पणी प्रियांकांनी केली आहे.
युरोपीयन समुदायाचे २८ सदस्यांचे पथक आजपासून जम्मू-काश्मीरचा दौरा करणार आहे. या पथकानं सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची भेट घेऊन चर्चा केली. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर या राज्याचा दौरा करणारे हे पहिलेच परदेशी शिष्टमंडळ असणार आहे. जागतिक पातळीवर पाकिस्तान काश्मीरबाबत अपप्रचार करत असल्यानं जगाला वास्तव परिस्थितीची माहिती करून देण्याचा भारताचा हा प्रयत्न आहे. मात्र, देशातील विरोधी पक्षांनी सरकारच्या या निर्णयावर टीकेची झोड उठवली आहे.
काँग्रेस नेत्या यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला. ‘काश्मीरमध्ये युरोपच्या प्रतिनिधींना फेरफटका मारण्याची आणि हस्तक्षेप करण्याची परवानगी दिली जाते. मात्र, भारतीय खासदार व राजकीय नेत्यांना विमानतळावरूनच परत पाठवलं जात आहे. मोठा अजब राष्ट्रवाद आहे हा,’ असं प्रियाकांनी म्हटलं आहे.