Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कापूस पिकाला मिळणार दोन हजार रुपयात प्रति हेक्टरी चाळीस हजार रुपयांचे विमा कवच

najarkaid by najarkaid
July 20, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 20 – केंद्र शासनाने खरिप हंगाम 2020 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना भारती ॲक्सा जनरल इंन्शुरन्स कं. लि. मुबंई यांच्या सहकार्याने जळगाव जिल्हयात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत 31 जुलै, 2020 पर्यंत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.

अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिके घेणारे (कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणा-या शेतक-यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार व तसेच बिगर कर्जदार शेतक-यांना ऐच्छिक आहे. जे कर्जदार शेतकरी स्वत:च्या स्वाक्षरीसह योजनेत सहभागी न होणेबाबत घोषणापत्र देणार नाहीत, त्या सर्व शेतक-यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल.

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरिप हंगाम 2020 मध्ये राबवण्यिात येत आहे. योजनेंतर्गत समाविष्ट पिके, विमा संरक्षित रक्कम व शेतक-यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता तपशील खालीलप्रमाणे.
खरिप ज्वारी- विमा संरक्षित रक्कम 24 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 480 रुपये,
बाजरी- विमा संरक्षित रक्कम 20 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 400 रुपये,
सोयाबीन- विमा संरक्षित रक्कम 36 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 720 रुपये,
भुईमुग- विमा संरक्षित रक्कम 32 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 640 रुपये,
तीळ- विमा संरक्षित रक्कम 22 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 440 रुपये,
मुग- विमा संरक्षित रक्कम 20 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 400 रुपये,
उडिद- विमा संरक्षित रक्कम 20 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 400 रुपये,
तुर- विमा संरक्षित रक्कम 25 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 500 रुपये,
कापुस- विमा संरक्षित रक्कम 40 हजार रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 2 हजार रुपये,
मका- विमा संरक्षित रक्कम 26 हजार 200 रुपये, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर 524 रुपये इतका असून
शेतक-यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरिप हंगामासाठी व इतर पिकांसाठी 2 टक्के व कापूस पिकासाठी 5 टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे.
जिल्हयातील पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यात येत असुन नैसर्गिक आपत्तीपासून नुकसान टाळण्यासाठी पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतक-यांनी सहभागी व्हावे. शेतक-यांनी दि. 31 जुलै 2020 अंतिम मुदतीची वाट न पाहता आजपासुनच पिकाचा विमा काढण्यात यावा, जेणेकरुन शेवटच्या दिवशी घाई होणार नाही. जनसुविधा केंद्रावर विनामुल्य अर्ज स्विकारले जाणार आहेत.

सन 2019-20 या मागील वर्षाची 208.34 कोटी विमा नुकसान भरपाई नुकतीच मंजूर झाली असून जिल्ह्यातील 1 लाखापेक्षा अधिक शेतक-यांना याचा लाभ झालेला आहे. तरी जास्तीत जास्त शेतक-यांनी या विमा योजनेत भाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

या योजनेच्या लाभासाठी संपर्काचे ठिकाण-

आपल्या तालुक्यातील नजीकच्या जिल्हा बँक शाखा, सर्व राष्ट्रीयकृत बॅक, तालुका कृषि अधिकारी कार्यालय (सर्व तालुके), उपविभागीय कृषि अधिकारी, जळगाव, पाचोरा, अंमळनेर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव आकाशवाणी शेजारी, प्रशासकीय इमारत, दुरध्वनी क्र. 0257-2239054/2236708, भारती ॲक्सा जनरल इंन्शुरन्स कं. लि. मुबंई टोल फ्री क्रमांक 1800 103 2292, श्री. गजानन पाटील, मोबाईल क्रमांक-8087305060, जिल्हा व्यवस्थापक, सामान्य सुविधा केंद्र, (सी.एस.सी केंद्र) जळगाव येथे संपर्क साधून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 4 हजार 826 रुग्ण बरे होऊन घरी

Next Post

महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2019 मुलाखतीच्या तारखा जाहीर

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post

महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2019 मुलाखतीच्या तारखा जाहीर

ताज्या बातम्या

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us