मुंबई : कर्जावरील हप्ते भरण्याला आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ दिल्याचे दास यांनी जाहीर केले आहे. रिझर्व्ह बॅँकेने याआधी ०१ जूनपर्यंत अशी मुदतवाढ दिली होती. त्यामध्ये आता 31 आॅगस्टपर्यंत वाढ करण्यात येत असल्याचे दास यांनी स्पष्ट केल्याने कर्जदार काही प्रमाणात सुखावला आहे.
भारतीय रिझर्व्ह बॅँकेने रेपो आणि रिव्हर्स रेपोदरामध्ये केलेल्या कपाती धोरणामुळे विविध कर्जे स्वस्त होणार असून ठेवींवरील व्याजदर कमी होणार आहे. रेपो दरामध्ये ०.४० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने कर्जावरील व्याजदरामध्ये कपात होणार असून नागरिकांना कर्ज कमी व्याजाने मिळू शकणार आहेत. त्याचप्रमाणे रिव्हर्स रेपो दरामध्येही ०.४० टक्के कपात करून तो ३.३५ टक्के केला जाणार आहे. यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये अधिक रोकड उपलब्ध होऊन चलन टंचाई कमी भासेल असा अंदाजही रिझर्व्ह बॅँकेने व्यक्त केला आहे.
















