Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

करोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खाजगी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवणे योग्य नाही – जिल्हाधिकारी

najarkaid live by najarkaid live
March 26, 2020
in आरोग्य
0
एसडी-सीड तर्फे व्यावसायिक कौशल्यांचा विकास होण्यासाठी शिबीर संपन्न
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) दि. 26 – डॉक्टर रुग्णांना सेवा देण्यासाठी नेहमीच तत्पर असतात, त्यामुळेच समाजानेही डॉक्टरांना देवदूताची उपमा दिलेली आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवल्यास अत्यावस्थ रुग्णांना उपचार मिळण्यात अडचणी निर्माण होतील याची जाणीव ठेवून खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवू नये. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन आहे. याबाबत जिल्हास्तरावर सुरु असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त सुशील कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे, अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त य. कों. बेंडकुळे यांचेसह सर्व अंमलबजावणी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ ढाकणे पुढे म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर कारणासाठी नागरीक व खाजगी वाहने रस्त्यावर येणार नाही, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहचण्यास अडथळा होणार नाही, याची काळजी पोलीस विभागाने घ्यावी. लॉकडाऊनच्या काळात जे खाजगी डॉक्टर आपले दवाखाने बंद ठेवून रुग्णांची गैरसोय करतील. त्यांच्याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनला अहवाल पाठविण्यात येईल. जिल्ह्यात कुठेही औषधांचा तुटवडा भासणार नाही याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी. आवश्यकता भासल्यास आरोग्य विभागाने तातडीने औषधांची खरेदी करावी. जीवनाश्यक वस्तुंचा सध्याजरी तुटवडा नसल्या तरी भविष्यातही होवू नये यासाठी आवश्यक ते नियेाजन पुरवठा विभागाने करावे. फळे व भाजीपाला विक्रेत्यांनी एकाच ठिकाणी विक्रीस न बसता हातगाडीवर चौकाचौकात व कॉलनीमध्ये जाऊन विक्री करावी. जेणेकरुन खरेदीसाठी एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही. जीवनावश्यक वस्तुंची वाहतुक करणाऱ्या वाहनांना परिवहन विभागाने तर अत्यावश्यक सेवेचे पासेस तहसीदार यांनी द्यावे. आपतकालीन परिस्थती उद्भवल्यास तातडीची उपाययोजना म्हणून जिल्ह्यात किमान 500 बेड आवश्यक त्या सोयीसुविधांसह तयार ठेवण्याच्या सुचनाही त्यांनी महसुल व सार्वजनिक बांधकाम विभागास दिल्यात. त्याचबरोबर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालये लॉकडाऊनच्या काळात बंद राहणार नाही याची सर्व संबधितांनी काळजी घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी यांनी यंत्रणेला दिल्यात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोना पासून खबरदारी म्हणून पत्रकार संतोष पाटील यांनी स्वखर्चातून केली फवारणी!

Next Post

जळगाव शहरातील आठ हॉटेल्सना घरपोच फुड पार्सलसाठी परवानगी !

Related Posts

How to Lose Weight Fast

How to Lose Weight Fast: झपाट्याने वजन कमी करण्याचे नैसर्गिक उपाय

July 2, 2025
Diabetes Information in Marathi

डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय | Diabetes Information in Marathi

July 1, 2025
तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

June 30, 2025
जाणून घ्या हिवाळ्यात खजूर खाण्याचे फायदे

जाणून घ्या हिवाळ्यात खजूर खाण्याचे फायदे

December 30, 2023
Omicron corona Variant Jn1; कोरोनाच्या नव्या व्हेरिंएटने टेन्शन वाढवलं,२९२ रुग्णांची नोंद तर ४५ सक्रिय रुग्ण

Omicron corona Variant Jn1; कोरोनाच्या नव्या व्हेरिंएटने टेन्शन वाढवलं,२९२ रुग्णांची नोंद तर ४५ सक्रिय रुग्ण

December 21, 2023
Ayushman Cards ; ‘या’ गंभीर आजारावर आता ५ लाखापर्यंत मोफत उपचार ; असा घ्या लाभ

Ayushman Cards ; ‘या’ गंभीर आजारावर आता ५ लाखापर्यंत मोफत उपचार ; असा घ्या लाभ

December 9, 2023
Next Post
जळगाव शहरातील आठ हॉटेल्सना घरपोच फुड पार्सलसाठी परवानगी !

जळगाव शहरातील आठ हॉटेल्सना घरपोच फुड पार्सलसाठी परवानगी !

ताज्या बातम्या

Pune Kondhwa Girl Spray Assault: तोंडावर स्प्रे मारून मुलीवर अत्याचार, आरोपीने घेतली सेल्फी

July 3, 2025
Breking news

Married Couple Suicide on Railway Tracks ; तीन तीन मुलांचे आई-बाप… पण प्रेमासाठी रेल्वेखाली उडी!

July 3, 2025
Police Bharti 2025

Police Bharti 2025: महाराष्ट्रात 10000 पदांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी पोलिस भरती

July 3, 2025
Jalgaon Bhu Sampadan Scam

Jalgaon Bhu Sampadan Scam ; विधानसभेत गाजला, चौकशीची मागणी

July 3, 2025
MLA Letterhead Scam 2025

MLA Letterhead Scam 2025 ; आमदारांचे बनावट लेटरहेड वापरून ३ कोटी निधीची अफरातफर – मोठा घोटाळा उघड

July 3, 2025
I love you

 I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

July 3, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us