Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

करोनाची धास्ती! विधिमंडळ अधिवेशन शनिवारपर्यंतच

najarkaid live by najarkaid live
March 13, 2020
in राज्य, राजकारण
0
करोनाची धास्ती! विधिमंडळ अधिवेशन शनिवारपर्यंतच
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – राज्यात करोनाचे ११ रुग्ण आढळल्याने राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनही गुंडाळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन  शनिवारपर्यंतच घेण्याचा प्रस्ताव आज विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे विधिमंडळाचं कामकाज शनिवारपर्यंतच चालणार आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन विधिमंडळाचं कामकाज शनिवारपर्यंत करण्यात येणार असून तसा प्रस्ताव विधानसभेत आणण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार कामकाज शनिवारपर्यंतच घेण्याचा प्रस्ताव आज विधानसभेत मांडण्यात आला असून त्याला सदस्यांनी मंजुरी दिली आहे. करोनाला घाबरून हा निर्णय घेण्यात आला नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. करोनाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी आपआपल्या मतदारसंघात असावेत, तसेच अधिकारी वर्गही आपल्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणी असावा, जेणे करून करोनाची परिस्थिती उद्भवल्यास उपाययोजना करणं सोपं जाईल. तसेच करोना रोखण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास अधिकाऱ्यांना वेळ मिळेल, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं पवार यांनी सांगितलं.

दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून आज विधिमंडळ परिसरात सर्वसामान्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. आमदार आणि मंत्र्यांनाच विधिमंडळात प्रवेश देण्यात येत होता. आज अनेक आमदार विधानसभेत तोंडाला मास्क लावून येताना दिसले. भाजपचे आमदार योगेश सागर यांनी तोंडाला मास्क लावलेला होता. मी भीतीमुळे नाही तर आरोग्याची काळजी घेण्यासाठी मास्क लावलं आहे. करोना व्हायरसमुळे विधानसभेचे कामकाज किती दिवस घ्यायचं हा निर्णय बिझनेस अॅडव्हायझरी विधानसभा घेईल, पण मी जनजागृती आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी मास्क लावला आहे, असं सागर यांनी सांगितलं. करोनामुळे राज्यातील अनेक कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. शनिवारी नागपुरात ओबीसी महासंघाचा कार्यक्रम होणार होता. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली हो कार्यक्रम होणार होता. मात्र, हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हे सरकार देशाचा कारभार हाकण्याच्या लायकीचं नाही: प्रकाश आंबेडकर

Next Post

जिल्हाधिकारी यांनी दखल घेवून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करीत कारवाई करावी

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
जिल्हाधिकारी यांनी दखल घेवून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करीत कारवाई करावी

जिल्हाधिकारी यांनी दखल घेवून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करीत कारवाई करावी

ताज्या बातम्या

CBSE Scholarship 2026 : एकुलत्या एक मुलीसाठी केंद्र सरकारची खास स्कॉलरशिप योजना, दरमहा 1000 रुपये मिळणार!

CBSE Scholarship 2026 : एकुलत्या एक मुलीसाठी केंद्र सरकारची खास स्कॉलरशिप योजना, दरमहा 1000 रुपये मिळणार!

March 15, 2026
“₹60 हजारात iPhone 16!” “Apple चाहत्यांसाठी मोठी ऑफर”

iPhone 16 Price Drop : Apple मोबाईल चाहत्यांसाठी मोठी खुशखबर! 

March 15, 2026
HDFC ERGO General Insurance विमा योजना जाणून घ्या

HDFC ERGO General Insurance विमा योजना जाणून घ्या

March 15, 2026
Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

March 15, 2026
एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

Cyber Security Alert : एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

March 15, 2026
राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us