वरणगावं(प्रतिनिधी:-देशाच्या अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी ऑर्डनन्स फॅक्ट रीचे निगमीकरण करीत असल्याचे घोषित केले असून तसेच आर्डनन्स फॅक्टरीमध्ये एफडीआय 49% वरून 74 % करण्यात आले आहे या कारणाने ऑर्डनन्स फॅक्टरी खाजगीकरण आत जाण्याचे चिन्हे दिसत असून याचा निषेध ऑर्डनन्स फॅक्टरी मधील कामगार युनियन इंटक व भारतीय मजदूर संघ यांनी यांनी निषेध केला आहे. यासाठी संयुक्त समिती स्थापन करण्यात आली असून याचा कडाडून विरोध करण्यात येणार असून यासाठी परिवारा सहित रस्त्यावर उतरू असे या संघटनांच्या नेत्यांनी सांगितले आहे कारपोरेशन व F DI चा मुद्दा मागे घ्यावा यासाठी संप व इतर मार्गाने आंदोलन करण्यात येणार यासाठी वरणगाव फॅक्टरी ज्युनियर क्लब मध्ये नुकतीच पत्रकार परिषद घेण्यात आली असून कामगार यांचे सुनील महाजन ,विशाल भालशंकर, इंटकचे महेश पाटील भारतीय मजदूर संघाचे बी .बी. सपकाळे ,एस एस चौधरी ,योगेश सूर्यवंशी, डी एम पाटील , भरत राउत आदी उपस्थित होते ह्या कार्पोरेशन बद्दल त्यांनी पत्रकार परिषदेत महत्वाची माहीती दिली.
















