जळगाव,(प्रतिनिधी)- दि. ५ सप्टेंबर 2021 रोजी इकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव तर्फे ऑनलाईन शिक्षक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख वक्ते म्हणून इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. डॉ. अ. करीम सालार यांना आमंत्रित करण्यात आले होते.
मो. रेहान या विदयार्थ्याने तिलावत सादर केली. उज़मा सै. साजीद ने तराना ए इकराचे सादरीकरण केले. उज़मा नाजीम शेख, अर्शीन कामिल शेख आणि मिनाक्षी माळी या विदयार्थिंनींनी प्रभावीपणे आपले विचार मांडले.
प्राचार्य इरफान शेख यांनी शिक्षकांच्या योगदानाचे महत्वं सांगीतले. आपल्या अध्यक्षिय भाषणात डॉ. अ. करीम सालार यांनी सांगीतले की, “आधुनिक आध्यापनाची साधने शिक्षकांची जागा घेवू शकत नाही. माझा या साधनांच्या उपयोगास विरोध नाही. पण, या मुळे शिक्षक आपले पारंपारिक महत्वं गमवत असल्याचे दिसते. “ शिक्षक ” व्यक्तीविकासाचे, समाज व राष्ट्र विकासाचे एकमेव साधन आहे. त्याचा पर्याय काहिच असू शकत नाही.” कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. व्ही. टी. पठाण यांनी व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. ईश्व्र सोनगरे यांनी केले.