रावेर, – एका “आई” ने आपल्या नऊ महिन्याच्या बाळाला हातात घेऊन चक्क 400 कि.मि चा सुरत ते रावेर असा पायी प्रवास करून सर्वांनाच थक्क करून टाकले. सर्वच जण मातृ दिनी आपला आई सोबतचे फोटो शेयर करत होते पण ती आपला मुलीला घेऊन भर उन्हात पायपीट करत होती.
कोरोना मुळे संपूर्ण भारत लाॅकडाऊन करण्यात आले. या बंद मुळे अनेक कंपनी मधील मजुर आप आपला राज्यातील घरी जाणासाठी भेटेल पायपीट करत आहे .
असच एक मजुर सुरत ( गुजरात ) येथून उत्तर प्रदेश मध्ये आपला गावी जाणा साठी आपला जवळ असलेल्या काही पैसांनी सायकल विकत घेतली व संसार उपयोगी वस्तू सायकलचा दोन्ही बाजूने बांधून आपला पत्नीसह दोन मुलांना घेऊन निघाला सुरत ते रावेर असा 400 किलो मिटर चा वर सायकल प्रवास करत रावेर येथे आले रावेर येथे काही सामाजिक संस्था व पोलिस निलेश लोहार यांनी थांबवून विचार पुस केली असता मजुराचा पत्नी ने जे सांगितले ते मनाला वेदना दायकच होत.
मी माझा १ महिन्याचा मुलीला हातात घेऊन पायी चालत गावी जात आहे . व माझे पती सायकल वर माझा 3वर्षीय मुलाला व साहीत्य सोबत पायी चालत रावेर पर्यंत आलो. रावेर मध्ये यांना थांबवून जेवण बाळाला दुध बिस्कीट दिले ति आम्हाला तिची व्यथा सांगत असतांना तिचा 3 वर्षाचा मुलगा तिला आपला हातातील चिवडा खाऊ घालत होता मातृ दिनी असा प्रसंग पाहुन क्षणभर अनेकांच्या मन भारावून गेले.
या परिवारस गोळा औषध देऊन पुढे पाठवण्यात आले.