Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकलव्य गॉडेल रेसिडेंशियल स्कुलमध्ये सन २०२५-२६ प्रवेश पूर्व स्पर्धा परिक्षेत सहभागी होण्याचे विद्यार्थांना आवाहन

najarkaid by najarkaid
December 24, 2024
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव :  आदिवसी विकास विभागाच्या इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूलमधील प्रवेशासाठी सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता ६ वी च्या वर्गात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याची स्पर्धा परिक्षा घेवुन गुणानुक्रमे ३० मुले व ३० मुली या प्रमाणे प्रत्येक एकलव्य स्कुल मध्ये प्रवेश देण्यासाठी तसेच इयत्ता ७ वी ते ९ वी च्या वर्गातीन अनुशेष भरुन काढण्यासाठी अनुसूचित जमातीच्या व आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी २३ फेब्रुवारी रोजी परिक्षा होणार आहेत. या परिक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना १० जानेवारी पर्यंत आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांमार्फत यावल एकात्मिक प्रकल्प अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करायचे आहेत.

शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, दहिवद, ता. अमळनेर, जि. जळगांव व शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, गंगापूरी, ता. जामनेर, जि. जळगांव या दोन परिक्षा केंद्रावर स्पर्धा परिक्षा रविवार दिनांक २३ फेब्रुवारी, २०२५ रोजी इयत्ता ६ वीच्या सकाळी ११ ते ०१ यावेळेत आणि इयत्ता ७ वी ते ९वी च्या विद्यार्थ्यांना सकाळी ११ ते ०२  या वेळेत आयोजित करण्यात आली आहे.

जे अनुसूचित जमातीचे विद्यार्थी सन २०२४-२५ या चालू शैक्षणिक वर्षा मध्ये इयत्ता ५ वी च्या वर्गात शिकत असून, परीक्षेला बसलेले आहेत. व पूढील वर्षी इयत्ता ६ वी मध्ये तसेच ७ वी ते ९ वी मध्ये प्रवेश घेणार आहेत अशा इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करायचे आहेत. अर्जाचा नमुना यावल प्रकल्प कार्यालय तसेच मुख्याध्यापक व सर्व गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती येथे उपलब्ध आहे.

या परिक्षा शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका व इतर मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेले इ. ५ वी पास ते ९ वी च्या विद्यार्थ्यां करीता पूर्णतः खुली आहे. या परिक्षेकरिता विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक कमाल उत्पन्न रु. सहा लाखाच्या आत असावे तसेच  पालक शासकीय व निमशासकीय नोकरीत नसावे. अर्जा सोबत सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला पालकांच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक आहे. अनुसूचित जमातीतील अपंग विद्यार्थ्यांसाठी ३ टक्के व आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ५ टक्के जागा आरक्षित राहणार आहे. तरी जास्तीत जास्त अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी अरुण पवार  यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहेत

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रीय फलोत्पादन मंडळातर्फे जळगावची पायलट प्रकल्पासाठी निवड; केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची माहिती

Next Post

खाजगी वाहनांवर ‘महाराष्ट्र शासना’चे नाव, पाटी किंवा स्टीकर लावल्यास होणार कारवाई; सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारींची माहिती

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post

खाजगी वाहनांवर ‘महाराष्ट्र शासना’चे नाव, पाटी किंवा स्टीकर लावल्यास होणार कारवाई; सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारींची माहिती

ताज्या बातम्या

Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us