Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकनाथराव खडेसेंच्या भाजपा प्रवेशाच्या निर्णयानंतर रोहिणी खडसेनीं घेतला मोठा निर्णय!

najarkaid by najarkaid
April 6, 2024
in Uncategorized
0
एकनाथराव खडेसेंच्या भाजपा प्रवेशाच्या निर्णयानंतर रोहिणी खडसेनीं घेतला मोठा निर्णय!
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी भाजपात प्रवेश करून स्वगृही परतण्याचा निर्णय निर्णय घेतल्याचे आज दुपारी मीडियाच्या माध्यमातून जाहीर केले असून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला धक्का दिला आहे.दरम्यान खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे खेवलकर या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष असून त्या काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या, अखेर रोहिणी खडसे यांनी तासाभरापूर्वीच निर्णय घेतला असून आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात राहणारं असल्याचा निर्णय घेतला आहे.

रोहिणी खडसे काय म्हणाल्या…

मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेशाध्यक्षा म्हणून काम करीत आहे, मी याच पक्षात आहे व भविष्यातही याच पक्षात राहणार आहे.
मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांसोबतच …
लढ़ेंगे और जीतेंगे… असं ‘x’ या सोशल मीडिया प्लॅटफार्म वर ट्विट करून आपला निर्णय जाहीर केला आहे.

रोहिणी खडसे यांनी वडील एकनाथ खडसे यांच्या सोबत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता त्या नंतर एकनाथ खडसे यांना शरद पवार यांनी विधानपरिषद आमदार म्हणून बहाल केलं होतं तर रोहिणी खडसे यांना पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती. एकनाथराव खडसे व त्यांची कन्या रोहिणी खडसे राष्ट्रवादी पक्षात गेल्यावर देखील भाजपा खासदार असलेल्या खडसेंच्या सून रक्षा खडसे यांनी भाजपातचं राहणं पसंत केलं होतं. आता मात्र खडसे राष्ट्रवादी पक्षाला धक्का देत पुन्हा स्वगृही परतत असतांना मात्र कन्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात राहणे पसंत करत आहे यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होतं आहे.

मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेशाध्यक्षा म्हणून काम करीत आहे, मी याच पक्षात आहे व भविष्यातही याच पक्षात राहणार आहे.
मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांसोबतच …
लढ़ेंगे और जीतेंगे ✊✊
@NCPspeaks pic.twitter.com/XqHrrnJFol

— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) April 6, 2024

खडसेंचा भाजपा प्रवेशाचा मुहूर्त लवकरचं 

एकनाथराव खडसे भाजप मध्ये जाणार असल्याची माहिती खुद्द खडसे यांनीच मीडियाला दिली असून लवकरचं प्रवेशाचा मुहूर्त ठरणार आहेत. यावेळी त्यांच्या सोबत जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील कोण कोण प्रवेश करणार हे पाहणे महत्वाचे ठरेलं. दरम्यान एकनाथराव खडसे व भाजपा नेते देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्यासोबत असलेले कटू संबंध, उघड उघड एकमेकांविरुद्ध असलेल्या भूमिका संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे.खडसेंच्या भाजपा प्रवेशानंतर कसं जुडवून घेतात याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ब्रेकिंग ; भजपात प्रवेश करणार ; आ.एकनाथराव खडसे

Next Post

भारतीय जनता पार्टीचा ४४ वा वर्धापन दिन वयोवृद्ध कार्यकर्त्यांच्या हस्ते झालेलं ध्वजारोहण ठरलं लक्षवेधी

Related Posts

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
Next Post
भारतीय जनता पार्टीचा ४४ वा वर्धापन दिन वयोवृद्ध कार्यकर्त्यांच्या हस्ते झालेलं ध्वजारोहण ठरलं लक्षवेधी

भारतीय जनता पार्टीचा ४४ वा वर्धापन दिन वयोवृद्ध कार्यकर्त्यांच्या हस्ते झालेलं ध्वजारोहण ठरलं लक्षवेधी

ताज्या बातम्या

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us