Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ तर्फे वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना ; पात्र लाभार्थ्यांना मिळणार लाभ

najarkaid live by najarkaid live
December 24, 2024
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ व महामंडळामार्फत उपकंपनी पैलवान कै. मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ आणि उपकंपनी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय या दोन उपकंपन्या सुरू केल्या असून  या अंतर्गत योजना  राबविण्यात येत आहे आहे.

जळगाव जिल्हा कार्यालय येथील उपकंपनी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ तर्फे वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहे ज्याअंतर्गत बँकेमार्फत लाभार्थ्यांना 10 लाखांपर्यंत कर्ज वितरित केले जाणार आहे. यासोबतच गटकर्ज व्याज परतावा योजना देखील राबविण्यात येत आहे, ज्यामध्ये लाभार्थ्यांना 50 लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. कर्ज रक्कमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम (12%  च्या मर्यादेत) व्याजपरतावा रक्कम अनुदान स्वरुपात बँक प्रमाणिकरणानुसार लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येणार आहे. या दोन्ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविल्या जात असुन अर्जदारांनी vjnt.in या वेब प्रणालीवर अर्ज करणे अनिवार्य आहे.

यासोबतच उपकंपनी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळातर्फे २५% बीज भांडवल कर्ज योजना आणि १ लाखांपर्यंत थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे.

२५% बीज भांडवल कर्ज योजना अंतर्गत महामंडळाचा सहभाग २५%  यात महामंडळ नियमावली राहील व राष्ट्रीय कृत बँक सहभाग ७५% यास बँकेची नियमावली राहील असे एकुण रुपये ५ लक्ष असुन योजनेचे २०२४-२०२५ या आर्थिक उदिष्ट प्राप्त झाले आहे. रु १,००,०००/- थेट कर्ज योजना अंतर्गत महामंडळाचा सहभाग १००% राहणार आहे.

थेटकर्ज योजनेसाठी गरजूंनी  महामंडळाच्या जिल्हा कार्यालयास भेट दयावी व अर्जासाठी जातीचा दाखला व आधार कार्डची प्रत सोबत आणवी आणि अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयाच्या  ०२५७-२९९३४०२ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. इच्छुक विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच, विशेष मागास प्रर्वगातील नवउद्योजक तसेच बेरोजगार युवक युवतींनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक श्री. आर.एस. नरवडे यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खाजगी वाहनांवर ‘महाराष्ट्र शासना’चे नाव, पाटी किंवा स्टीकर लावल्यास होणार कारवाई; सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारींची माहिती

Next Post

जळगाव येथील सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थे मार्फत ‘वन जीपी वन बीसी’ प्रशिक्षण व परीक्षेचे आयोजन

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

जळगाव येथील सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थे मार्फत 'वन जीपी वन बीसी' प्रशिक्षण व परीक्षेचे आयोजन

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us