जळगाव – उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,जळगाव येथील शासकीय जागेवर रस्ता सुरक्षा प्रबोधिनी सभागृह व सलग्न गोडाऊनचे भुमिपुजन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या हस्ते 9 जानेवारी 2020 रोजी संपन्न झाले. याप्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयाचे डी.एस.पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता एस.आर.राऊत, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही ,सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते.