Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उत्तर महाराष्ट्रातलं सर्वाधिक अत्याधुनिक यंत्रसामुग्रीनी सज्ज रुग्णालय म्हणून ओळख निर्माण होतेय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

najarkaid by najarkaid
September 26, 2024
in Uncategorized
0
उत्तर महाराष्ट्रातलं सर्वाधिक अत्याधुनिक यंत्रसामुग्रीनी सज्ज रुग्णालय म्हणून ओळख निर्माण होतेय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) दि. 26 – आपण ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा बळकट करण्यास प्राधान्य दिले आहे. मॉड्युलर जळीत कक्ष व अतिदक्षता विभागाचे लोकार्पण हे आरोग्य सेवेत एक महत्त्वपूर्ण पावले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी मागच्या चार वर्षात जिल्हा वार्षिक नियोजन मधून अत्याधुनिक करणासाठी नव्या तंत्रज्ञानाने सज्ज असलेले यंत्र सामुग्री दिले आहेत. आज त्यात अत्याधुनिक जळीत उपचार वॉर्डची भर पडली. उत्तर महाराष्ट्रातलं सर्वाधिक अत्याधुनिक रुग्णालय म्हणून ओळख निर्माण होत आहे. डीपीडीसीतून दिलेल्या मोठ्या निधीमुळे सिव्हील हॉस्पिटल व महाविद्यालयाचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलला असल्याने सर्वसामान्यांना आपल्या हक्काचे हॉस्पिटल वाटत असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते सिव्हिल हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय येथे मॉड्युलर जळीत कक्ष व अतिदक्षता विभागाच्या लोकार्पण सोहळा प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. स्मिताताई वाघ होत्या

सुसज्ज असे जळीत कक्ष व अतिदक्षता विभाग
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील अत्याधुनिक जळीत उपचार वॉर्डचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व आणि खा. स्मिता वाघ यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा 20 खाटांच्या जळीत कक्षात ( बर्न वार्ड) 5 खाटांचे आयसीयू, 5 विशेष जळीत खाटा आणि उर्वरित 10 जनरल जळीत खाटांचा समावेश असून येथील सर्व खाटा जळालेल्या रुग्णांसाठी राखीव आहेत. या अत्याधुनिक वार्डामध्ये वातानुकूलित (ए.सी.) सोयीसह रुग्णांना अधिक आरामदायी उपचार मिळत असून याशिवाय स्क्रीन ग्राफ्टिंगसारख्या जटिल शस्त्रक्रिया आणि हायड्रोशन सारख्या आधुनिक उपचार पद्धती या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तसेच सदर कक्षामध्ये एक सुसज्ज असे लहान शस्त्रक्रिया गृह देखील उपलब्ध आहे ज्यामुळे जळालेल्या रुग्णांच्या उपचाराची गुणवत्ता अधिक वाढेल. जंतुसंसर्ग कमी होणे, मृत्यूचे प्रमाण कमी होणे व रुग्ण बरा झाल्या व नंतरचे व्यंग/ विद्रूपपणा हे सर्व कमी होण्यास मदत होईल. डीपीडीसीच्या माध्यमातून एकूण 03 कोटी 60 लाख रुपये खर्च करण्यात आलेला आहे.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी खासदार स्मिताताई वाघ, जिल्हा नियोजन समिती सदस्य राधेश्याम अग्रवाल, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, सिव्हील सर्जन डॉ किरण पाटील, उप अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, डॉ. अक्षय सरोदे डॉ., डॉ. सुरेखा चव्हाण डॉ. राजेश जांभुळकर वैद्यकीय अधीक्षक, डॉ. विजय गायकवाड, योगिता बावस्कर , विश्वनाथ पुजारी दीपक शेजवळ, राजेश जांभूळकर, डॉ. चंद्रमोहन हरणे तसेच अधिसेविका प्रणीता गायकवाड, डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. समीर चौधरी तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख व त्या विभागातील डॉक्टर्स मेट्रन मॅडम व इतर नर्सिंग स्टाफ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी DPDC मार्फत देण्यात आलेल्या मॉड्युलर जळीत कक्ष व अतिदक्षता विभागासाठी यंत्रसामुग्री बाबत सविस्तर माहिती विषद करून यामुळे रुग्णांना होणारे फायदे याबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन उप अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे यांनी केले. आभार वैद्यकीय अधीक्षक, डॉ. विजय गायकवाड यांनी मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

४८ औषध उत्पादनावर सरकारची बंदी ; बीपी, डायबेटीससह ‘या’ मेडिसिन समावेश, औषधे घेण्याआधी एकदा तपासा…

Next Post

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा  एलईडी चित्ररथातून जिल्ह्यात जागर

Related Posts

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

March 22, 2026
दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
Next Post
सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा  एलईडी चित्ररथातून जिल्ह्यात जागर

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा  एलईडी चित्ररथातून जिल्ह्यात जागर

ताज्या बातम्या

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us