Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उत्तम मानसिक स्वास्थासाठी फिजीओथेरेपी किती म्हहत्वाचा आहे जाणून घेऊ या….

najarkaid by najarkaid
September 7, 2021
in आरोग्य
0
उत्तम मानसिक स्वास्थासाठी फिजीओथेरेपी किती म्हहत्वाचा आहे जाणून घेऊ या….
ADVERTISEMENT

Spread the love

दि. ८ सप्टेंबर हा जागतिक फिजीओथेरेपी दिवस. हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उत्तम आरोग्य म्हणजे उत्तम मानसिक स्वास्थ आणि उत्तम मानसिक स्वास्थासाठी फिजीओथेरेपी हाच एक गुरूमंत्र आहे. आजच्या जीवनशैलीमध्ये जनसामान्यांमध्ये फिजीओथेरेपीबद्दल अतिशय जागरूकता दिसून येते. कुठलाही आजार असो की शस्त्रक्रिया त्यानंतर त्यातून लवकर बरे होण्यासाठी भरमसाठ औषधे घेणे नापसंत असलेल्या रूग्णांचा फिजीओथेरेपीकडे कल वाढु लागला आहे.

शास्त्रीय पध्दतीने तज्ञांकडून केले जाणारे मार्गदर्शन, आजारातून मुक्त होण्यासाठी दिले जाणारे व्यायाम प्रकार आणि त्यातून होणारा लाभ या सर्व गोष्टींमुळे दिवसेंदिवस फिजीओथेरेपी उपचार घेणार्‍या रूग्णांची संख्या वाढत आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे सध्या ट्रेण्डमध्ये असलेल्या कोरोनाचे रूग्ण बरे करण्यात देखील अख्ख्या जगात फिजीओथेरेपीचा उपयोग होतांना दिसत आहे. कोरोनाबाधित रूग्ण बरा व्हावा यासाठी वैद्यकीय तज्ञ आतोनात प्रयत्न करीत आहेत. गंभीर रूग्ण बरे करण्यासाठी डॉक्टरांच्या आणि औषधांच्या जोडीला वैद्यकीय क्षेत्रातील आणखी काही लोक मदत करत असतात. त्यापैकी एक फिजीओथेरेपिस्ट जगभरातील अनेक डॉक्टरांनी कोरोनामध्ये फिजीओथेरेपीची योगदान अधोरेखित केले आहे. विशेष म्हणजे हे तज्ञ अतिदक्षता विभागातील डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून या विभागात रूग्णांना उपचार देत आहे.

कोविड – १९ संसर्ग झालेल्या रूग्णांच्या प्राथमिक व पुर्नवसन प्रक्रियेमध्ये भौतिकोपचार तज्ञ एक अतिशय महत्वाची भूमिका निभावतात.
कोविड-१९ च्या गंभीर आजारापासून मुक्तता
ज्या व्यक्तींना कोविड-१९ चा गंभीर संसर्ग झाला आहे त्यांना कृत्रीम श्वासोच्छवास, प्राणवायु सहाय्य अती आरामामुळे होणार्या शारिरीक बदलांवर उपचाराची गरज असते अशा रूग्णांना पुढील काही बदल जाणवतात.फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होणे, मानसिक आजार, थकवा व कमजोरी, गिळण्याला बोलण्याला त्रास होणे,सांधे बध्दता, कार्यक्षमता कमी होणे.

भौतिकोपचार तज्ञ या सर्व बदलांवर पुढील प्रमाणे मदत करू शकतात.
साधे-सोपे व्यायाम, फुफ्फुसाचीं क्षमता सुधरवणे, दैनिक कार्य सुरू करणे, श्वास घेतांना होणारा त्रास कमी करणे, आराम व कार्यशील असण्यामध्ये समतोल ठेवण्यास मदत करणे
, स्नायुंची क्षमता वाढविणे
जे कोरोना बाधित रूग्ण अतिदक्षता विभागात आहेत त्यांना फिजीओथेरेपीची नितांत गरज भासते. या थेरेपीला चेस्ट फिजीओथेरेपी देखिल म्हणतात. या पध्दतीमध्ये रूग्णांच्या श्वसनाचा मार्ग नियंत्रीत केला जातो.

रूग्ण झोपून असल्याने त्याच्या शरीरातील प्राणवायुची पातळी आणि चालू फिरू लागल्यावर त्याच्या शरीरातील प्राणवायुची पातळी यात फरक असतो. ही पातळी नियंत्रीत ठेवण्यात चेस्ट फिजीओथेरेपी मदत करते. शिवाय कोविड-१९ मुख्यत्वे श्वसन प्रणालीवर आघात करीत असल्याने अशा रूग्णांमध्ये एआरडीएस, न्युमोनिया अशा आजारांची लक्षणे दिसतात. अशा रूग्णांना अतिदक्षता विभागात देखिल दाखल करावे लागते. या परिस्थीतीमध्ये श्वसननलिका खुली ठेवणे, त्यातील कफ किंवा स्त्राव बाहेर काढणे व रूग्णाची ऑक्सीजन पातळी वाढविणे हे फिजीओथेरेपीस्टच्या कामाचे मुख्य स्वरूप आहे. तसेच काही श्वसनाचे व्यायाम, पोस्चुरल ड्रेनेज टेक्नीक देखिल चेस्ट फिजीओथेरेपीमध्ये वापरले जातात. या सर्व उपचार पध्दतीमुळे रूग्णाचा व्हेटीलेटर वरील कालावधी कमी करण्यास मदत होते व रूग्ण लवकर आजारातून बाहेर येतो.

कोरोनासारख्या गंभीर आजारातून बरे होण्यासाठी निश्चीतच वेळ लागतो. त्यामुळे पुन्हा दैनंदिन आयुष्यात परतण्यासाठी आपल्या जीवनात शारीरीक व्यायाम सामावून घेण्यासाठी व आपली क्षमता सुधारण्यासाठी एक भौतिकोपचार तज्ञ नक्कीच आपल्याला मदत करू शकतो. कोरोनाच्या या युध्दात कोरोनाला मात देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सर्व प्रयत्न करीत आहे. आपणही एक जबाबदार नागरिक म्हणून या यंत्रणेला शक्यतो मदत करू या.

कोविड रूग्णांमध्ये फिजीओथेरेपीची उपयुक्तता लक्षात घेता देशातील व राज्यातील प्रत्येक छोट्या मोठ्या कोविड रूग्णालयात मग ते खासगी असो कि शासकीय रूग्णालय असो फिजीओथरेपीस्ट आपली सेवा देत आहे. याकरीता महाराष्ट्र फिजीओथेरेपी परिषदेने सुध्दा काही मार्गदर्शक सुचना प्रसिध्द केल्या आहेत. प्रत्येक वैद्यकीय शाखा ही वेगळी असते व त्या पॅथीची उपचार पध्दती पण वेगळी असते. त्यामुळे जर कुणाला फिजीओथेरेपी उपचार पध्दतीची गरज असल्यास त्या रूग्णाने फिजीओथेरेपी विषयात पारांगत डॉक्टरकडुनच तो उपचार घ्यावा असे मी या लेखामार्फत आवाहन करू इच्छीते. कारण जसे इतर पॅथीमध्ये ढोंगी डॉक्टर असतात तसेच फिजीओथरेपीमध्ये सुध्दा बरेच तोतया फिजीओथेरेपीस्ट असतात. प्रत्येक फिजीओथेरेपीस्ट जेवहा आपले पदवी शिक्षण पुर्ण करतो त्यानंतर त्याला महाराष्ट्र फिजीओथेरेपी कॉन्सीलमध्ये रजीस्ट्रेशन करून घेणं गरजेच असते आणि हे रजीस्ट्रेशन केल्यास कॉन्सीलतर्फे एक ओळखपत्र दिल्या जाते.

या लेखाच्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करते की, आपण जेव्हा केव्हा कुणा फिजीओथेरेपीस्टकडे उपचार घेता कृपया आधी त्यांचे ओळखपत्र तपासून घ्या. जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही आणि तुम्ही एका पात्र फिजीओथेरेपीस्टकडुनच उपचार करून घेणार. शेवटी मी सर्वांना जागतिक फिजीओथेरेपी दिनानिमीत्त शुभेच्छा देते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तापी नदीकाठावरील नागरीकांना जिल्हा प्रशासनाचा सावधानतेचा इशारा

Next Post

चाळीसगावला पुन्हा सतर्कतेचा इशारा ; पाणी पातळी वाढली

Related Posts

Fake Paneer – बनावट पनीर ओळखण्याचे मार्ग व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Fake Paneer – सावधान! तुम्ही खात असलेलं पनीर बनावट तर नाही? ओळखण्याची सोपी चिन्हं

August 17, 2025
homeopathy sugar pills : होमिओपॅथी गोळ्या कशापासून बनतात?

homeopathy sugar pills : होमिओपॅथी गोळ्या कशापासून बनतात?

August 6, 2025
Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा 'हे' १० नियम

Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा ‘हे’ १० नियम

August 3, 2025
Nuga best

Nuga best : फ्री फ्री फ्री! आता जळगाव शहरात नूगा बेस्ट थेरपी पूर्णतः मोफत!

July 25, 2025
male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय... पण खरं आहे!

male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय… पण खरं आहे!

July 23, 2025
स्थूलता आणि शरीरावर होणारे परिणाम

Obesity and Breathing Problems: स्थूलतेमुळे परिणाम? – MRI विश्लेषणातून उलगडले!

July 22, 2025
Next Post
चाळीसगावला पुन्हा सतर्कतेचा इशारा ; पाणी पातळी वाढली

चाळीसगावला पुन्हा सतर्कतेचा इशारा ; पाणी पातळी वाढली

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

April 2, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us