
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहर मतदार संघातून आ. राजूमामा भोळे यांना लाखाचा लीड मिळणार असून अबकी बार 240 पार…हेच मिशन असल्याचे आ.राजूमामा भोळे यांच्या प्रचाराचे नारळ वाहून प्रचाराचा शुभारंभ करतेवेळी ना. गिरीश महाजन पत्रकारांशी बोलत होते.
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर महायुतीचे उमेदवार आ. सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांच्या प्रचाराचे नारळ जळगाव रथ चौकातील जुने राम मंदिर येथे ना. गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते वाहण्यात आले. यावेळी ना. डॉ.गुरुमुख जगवाणी,आ. स्मिता वाघ, आ.चंदू पटेल,खा.उन्मेष पाटील,महापौर सीमाताई भोळे,शिवसेनेचे शरद तायडे, विष्णू भंगाळे, आरपीयायचे अनिल अडकमोल, यांच्यासह महायुतीचे भाजपा, शिवसेना मित्रपक्षाचे असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.















