पारोळा :- गुरुपौर्णिमा महोत्सवअंतर्गत दि, १० जुलै ते १६ जुलै दरम्यान पारोळा तालुक्यातील सावखेडा होळ येथे इंद्रदेवेश्र्वरानंद सरस्वती महाराज यांच्या सान्निध्यात आरोग्य, शेती, व्यापार, सवॅ मानव जाति रोग मुक्ती, साठी १०८ कुडिंया महायज्ञ चे आयोजन करण्यात आले आहे.
२०३० पयॅंत५० टक्के लोक कॅसंर ग्रस्त, तर ७० टक्के लोक शुगर ग्रस्त असतील तसेच ७० टक्के पिण्याच्या पाणी ची कमतरता भासणार आहे, असे सांगितले जात आहे, वातावरणातील मोठ्या प्रमाणात प्रदूषण व खाण्या पिण्याच्या सवयी मुळे हे सर्व घटक मानवी जीवनावर प्रभाव करीत आहेत. पावसाचे देखील प्रमाणा दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे चित्र दिसत आहे. म्हणून वायुमंडल प्रभावीत झाले आहे. परिणामी या सर्व गोष्टी वर व वायुमंडला प्रभावीत करण्यासाठी आणि सर्व समाज रोग मुक्त करण्यासाठी हा जडीबुटी आयुर्वेद युक्त १०८ कुडिंया महायज्ञा चे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती महाराजांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली, या महयज्ञात ३टन गाइचे तुप व १२ टन वजना इतकी विविध प्रकारची वनस्पती व जडीबुटी चा वापर केला जाणार असून ही सर्व सामग्री राजस्थान व उत्तर प्रदेश बिहार आदि राज्या मधुन मागण्यात आली असल्याचे ही महाराजांनी सांगीतले, असे महायज्ञ उत्तर प्रदेश बिहार आदि राज्यात केले जातात, पंरतु आपल्या महाराष्ट्र राज्यात असे यज्ञ आज पर्यंत झालेले नाहीत, हा पहिलाच असा आयुर्वेदिक जडीबुटी युक्त यज्ञ आपल्या कडे होत असल्याची माहिती ही महाराजांनी पत्रकार परिषदेत दिली, या यज्ञा मुळे जवळपास २०० मीटर चा परीसर प्रभावीत होणार असल्याची माहिती ही देण्यात आली, या महायज्ञात तीन ते चार लाख लोक उपस्थित राहण्याचा अंदाज असल्याचे सांगितले, या यज्ञा चा लाभ घेणार्या दांपत्याला पर दिवसाला अकरा हजार रुपये इतकी देणगी स्वरुपात आकारली जाणार असल्याची माहिती ही महाराजांनी पत्रकार परिषदेत दिली, तत्पूर्वी दि, १० जुलै रोजी सकाळी ९वाजता पारोळा शहरातील बालाजी मंदिराजवळुन शोभायात्रा काढण्यात येइल या शोभायात्रेत १०८ संन्यासी १०८ बाल कीर्तनकार सहभागी होणार असल्याचे सांगितले,या वेळी देशातील अनेक भावीक उपस्थित राहणार असून, आपण ही परीसरातील सवॅानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.