Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आम्ही ‘त्या’ शाळेचे हेडमास्तर आहोत; शिवसेनेने सुनावले

najarkaid by najarkaid
December 11, 2019
in राष्ट्रीय, राजकारण
0
आम्ही ‘त्या’ शाळेचे हेडमास्तर आहोत; शिवसेनेने सुनावले
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – राज्यसभेत नागरिकत्व विधेयकावरून सुरू असलेल्या चर्चे दरम्यान शिवसेनेने भाजपवर जोरदार हल्ला चढवला. देशातील अनेक भागात या विधेयकाला विरोध होत आहे. विरोध करणारेही देशाचे नागरिक आहेत. आमचाही या विधेयकाला विरोध असून आम्हाला कुणाच्या देशभक्तीच्या प्रमाणपत्राची गरज नाही. आम्ही किती कट्टर हिंदू आहोत, याचंही प्रमाणपत्र आम्हाला द्यायची गरज नाही, असं सांगतानाच तुम्ही ज्या शाळेत शिकत आहात. त्या शाळेचे आम्ही हेडमास्तर आहोत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आमचे हेडमास्तर होते. अटलबिहारी वाजपेयी आणि श्यामाप्रसाद मुखर्जीही आमचे हेडमास्तर होते, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला. 

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या खास शैलीत भाजपवर टिकास्त्र सोडले. लोकशाहीमध्ये विरोधाचाही आवाज असतो. त्याची दखल घेतली पाहिजे. ज्या लोकांचा या विधेयकाला विरोध आहे, ते देशद्रोही आणि ज्यांचा पाठिंबा आहे ते देशभक्त असल्याची टीका केली जात आहे. ही भारतीय संसद आहे. पाकिस्तानची असेंम्बली नाही. तुम्हाला पाकिस्तानची भाषा आवडत नसेल तर पाकिस्तानला नेस्तनाबूत करा. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं राऊत म्हणाले.

पाकिस्तान किंवा इतर देशात आपल्या लोकांवर अत्याचार होत आहे, असं वाटतं तर तुम्ही त्यांना साथ दिली पाहिजे. तुम्ही बलवान आहात, असं सांगतानाच या देशात ज्यांनी ज्यांनी घुसखोरी केली. त्यांना देशाबाहेर काढलं पाहिजे. पाकिस्तानात अल्पसंख्याकांच्या अधिकारांचं हनन झालं आहे. ज्या लाखो-करोडो लोकांना तुम्ही आपल्या देशात आश्रय देणार आहात, त्यांना तुम्ही मतदानाचाही हक्क देणार आहात का? त्यांना २०-२५ वर्षे मतदानाचा हक्क दिला नाही तरच देशाची परिस्थिती समतोल राहील, असंही त्यांनी सांगितलं.

राज्यसभेतील परिस्थिती वेगळी आहे. आमच्या मनात शंका आहेत. त्यांचं समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर पुढे काय करायचे ते ठरवू. जे विधेयकाला पाठिंबा देणार नाहीत ते देशद्रोही ठरवणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. व्होटबँकेचं राजकारण करू नये. ते योग्य नाही. हिंदू-मुस्लीम फुटीचे पुन्हा प्रयत्न करू नयेत. याशिवाय या विधेयकात श्रीलंकेतील तामिळ हिंदुंबाबत काही नाही, याकडेही राऊत यांनी सकाळी लक्ष वेधले होते. यासंदर्भात पक्षानं अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

काँग्रेसच्या दबावामुळे शिवसेनेने भूमिका बदलली? देवेंद्र फडणवीसांची सरकारवर टीका

Next Post

गोपीनाथ मुंडे असते तर माझ्यावर अन्याय झाला नसता- खडसे

Related Posts

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
Next Post
गोपीनाथ मुंडे असते तर माझ्यावर अन्याय झाला नसता- खडसे

गोपीनाथ मुंडे असते तर माझ्यावर अन्याय झाला नसता- खडसे

ताज्या बातम्या

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us