Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदारांनी गर्वाची भाषा वापरली, अन उशिरा उपरती झाली : मा.आ. दिलीप वाघ

najarkaid live by najarkaid live
August 26, 2019
in जळगाव
0
आमदारांनी गर्वाची भाषा वापरली, अन उशिरा उपरती झाली : मा.आ. दिलीप वाघ
ADVERTISEMENT
Spread the love

पाचोरा – ७० वर्षात १४ आमदारांनी काहीच केले नाही – मला सर्व निस्तराव लागत आहे. मी साडे आठशे कोटीची कामे आणली” अशा वल्गना आ.किशोर पाटील यांनी केल्या. आपण जे बोलतो आहोत ते तालुक्यातील माजी मंत्री, आमदारांना कर्तुत्व शून्य म्हणून संबोधणारी विधाने आहेत. याची उपरती त्यांना उशिरा झाली. कदाचित जाणकार शिवसैनिकांनी आमदारांच्या लक्षात हे आणून दिले असावे. म्हणून केवळ बहुजन समाजाला खूष करण्यासाठी कै. के. एम. बापू पाटील यांना गौरवणारा कार्यक्रम त्यांनी जाहीर केला. पण एकदा धनुष्यातून सुटलेला बाण परत येत नाही याचे भान आमदारांना राहिलेले नाही.
भावनिक मुद्दे पुढे केले म्हणजे वस्तुनिष्ठ, खरा इतिहास लपवता येत नाही. आ. किशोर पाटील यांनी कै. के. एम. बापूंचा गौरव केला तर त्याला आमचा विरोध असण्याचे काहीच कारण नाही.आम्ही या निर्णयाचे स्वागतच करतो पण त्यामुळे मतदारसंघाचा विकास घडविणाऱ्या इतर नेत्यांना जाणून बुजून दूर ठेवण्याचा, त्यांचा नामोल्लेख सुद्धा टाळण्याचा दळभद्री आणि हलकटपणा कृतीतून आणि वाणीतून सिद्ध केला म्हणजे काही विकास कामांचा इतिहास बदलत नाही. आमदारांनी गर्वाची भाषा वापरली, अन उशिरा उपरती झाली.
कै.के. एम. बापूंचे कार्यकर्तृत्व निर्विवाद आहे. काँग्रेस विरोधात विरोधी पक्ष मजबूत करण्याचे काम कै.आप्पासाहेब ओंकार वाघ आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केले हा इतिहास सर्वश्रुत आहे. कै.बापूसाहेब, कै.थेपडे साहेब, कै.आप्पासाहेब यांच्या स्मृतीप्रित्यर्थ  दरवर्षी पी.टी.सी शिक्षण संस्थेत आम्ही व्याख्यानमाला चालवतो. त्यांना आदरांजली अर्पण करतो. गलिच्छ राजकारण करत नाही. बहुळा धरणाच्या उभारणीचा इतिहास आम्ही पत्रकार परिषदेतून मांडलाच आहे. तो खोटा ठरवता येत नाही. बहुळा धरणाची पायाभरणी करण्याची भूमिका बापूसाहेबांनी आणि वीस वर्षानंतर ते पूर्ण करण्याची भूमिका आप्पासाहेबांनी पार पाडली हे सत्य आहे. ते जरा पाटबंधारे खात्याचे रेकॉर्ड तपासून आमदारांनी मते मांडावीत, विषयाला फाटे फोडू नयेत. कै. आप्पासाहेबांची भूमिका नाकारू नये.
कै.बापूसाहेबांचे धरणस्थळावर स्मारक उभारण्याची कल्पना आणि धरणाचे नामकरण करण्याचा मनोदय हा काही बापूसाहेबांवर प्रेम असल्याने आमदारांनी व्यक्त केला असे नाही. तर, हे केवळ कै. ओंकारअप्पा आणि त्यांच्या वारसदार कार्यकर्त्यांवर निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेली कुरघोडी आहे. हे सिद्ध करायला न्यायाधीशांची अथवा विचारवंतांची गरज नाही. देशभरात धरणांची ओळख व्यक्तीची नावे देऊन होत नाही. धरणे नद्यांच्या नावाने ओळखले जातात. नद्यांना पवित्र मानून त्यांचे पावित्र्य राखण्याची भारतीय संस्कृतीची परंपरा आहे. धरणे अथवा मोठे प्रकल्प उभारणाऱ्याची नावे कोनशिलेच्या माध्यमातून पुढच्या पिढीला कळतात.
केवळ निवडणूक स्टंट म्हणून असे भावनिक मुद्दे आमदार उपस्थित करीत आहेत. कै.आर ओ. तात्यांनी दहा वर्ष आमदार या नात्याने नेतृत्व केले. ते पूर्वाश्रमीचे काँग्रेसीच होते. स्वतः किशोर पाटील गेल्या पाच वर्षापासून मतदार संघाचे नेतृत्व करत आहेत. या काळात कधीच त्यांच्यासमोर कै.बापूसाहेबांच्या स्मारकाचा विषय आला नाही. महिना-दिडमहिन्यात होणारी निवडणुक डोळ्यासमोर ठेवून आ. किशोर पाटील जनतेचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
शेवटी ही जाणीव करून द्यावीशी वाटते की पाचोरा मतदार संघाचा सार्वत्रिक विकास साधण्यासाठी झटणाऱ्या कोणत्याच नेत्याच्या कर्तुत्वाला झाकण्याचा उद्योग आम्ही कधीच करणार नाहीत. यापूर्वीही कधी केला नाही. कॉंग्रेस विरोधात संघर्ष करण्यात आमच्या घराण्याचा बहुतांश काळ खर्ची पडला. तरीही तत्कालीन काँग्रेस नेत्यांचे आम्ही स्मरण करतो. दिवंगत नेत्या विषयी संभ्रम निर्माण होईल अशी भूमिका आम्ही कधी मांडली नाही. पुढेही कधी ते पाप करणार नाही.
कर्तुत्ववान विभूतींना मरणोत्तर डावलण्याचा आणि त्यांचा नामोल्लेख टाळण्याचा हलकटपणाचा विचार परमेश्वराने आमच्या डोक्यात कधीच टाकू नये अशी प्रार्थना करतो.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रवादीला रामराम ठोकून शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत

Next Post

मा.आमदार चिमणराव पाटील यांचा सत्कार

Related Posts

फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशन चॅम्पियन्स

फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशन चॅम्पियन्स

July 29, 2025
Accident jalgaon news: देव दर्शनासाठी जाणाऱ्या दोन मित्रांचा दुचाकी-जीप अपघातात मृत्यू

Accident jalgaon news: देव दर्शनासाठी जाणाऱ्या दोन मित्रांचा दुचाकी-जीप अपघातात मृत्यू

July 29, 2025
Rave Party Pune: रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर अटकेत, रोहिणी खडसे यांची २४ तासानंतर प्रतिक्रिया

Rave Party Pune: रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर अटकेत, रोहिणी खडसे यांची २४ तासानंतर प्रतिक्रिया

July 28, 2025
jain irrigation : जैन इरिगेशनच्या पहिल्या तिमाहीचे सकारात्मक निकाल

jain irrigation : जैन इरिगेशनच्या पहिल्या तिमाहीचे सकारात्मक निकाल

July 27, 2025
Bangladeshi Woman Trafficking | जळगावमध्ये देहविक्रीचा पर्दाफाश !

Bangladeshi Woman Trafficking | जळगावमध्ये देहविक्रीचा पर्दाफाश !

July 25, 2025
Bhusawal Railway Route Change | भुसावळ विभागातील रेल्वे मार्गात बदल, प्रवाशांनी नोंद घ्या!

Bhusawal Railway Route Change | भुसावळ विभागातील रेल्वे मार्गात बदल, प्रवाशांनी नोंद घ्या!

July 25, 2025
Next Post
मा.आमदार चिमणराव पाटील यांचा सत्कार

मा.आमदार चिमणराव पाटील यांचा सत्कार

ताज्या बातम्या

Breking : १० वी, १२ वी पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर, येथे पहा

Breking : १० वी, १२ वी पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर, येथे पहा

July 29, 2025
क्राईम न्यूज

विजेचा करंट देत पतीची हत्या केली,मृतदेहाजवळचं शारीरिक…घटनेने समाजमन सुन्न!

July 29, 2025
PM Yashasvi Scholarship: 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ₹1.25 लाख, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

PM Yashasvi Scholarship: 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ₹1.25 लाख, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

July 29, 2025
PM Dhan Dhanya Krushi Yojana 2025: शेतकऱ्यांना 20,000 रुपये अनुदान, 24,000 कोटींचा निधी मंजूर

PM Dhan Dhanya Krushi Yojana 2025: शेतकऱ्यांना 20,000 रुपये अनुदान, 24,000 कोटींचा निधी मंजूर

July 29, 2025
UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..

UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..

July 29, 2025
फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशन चॅम्पियन्स

फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशन चॅम्पियन्स

July 29, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us