अमृता फडणवीस यांनी ‘आधुनिक भारत के चाणक्य’ असे ट्विट करत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शहा यांना ५६ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
अमित शहा हे आज ५६ वर्षाचे झाले आहेत. अमित शहा यांच्या निवडणूक व्यवस्थापन क्षमतेमुळे त्यांना ‘चाणक्य’ म्हणून देखील ओळखले जाते. अमित शहा यांना पक्षाची धुरा मिळाली तेव्हापासून भाजपासाठी ‘सुवर्णकाळ’झाला आहे. यामुळेच त्यांना ‘आधुनिक भारताचे चाणक्य म्हटलं जातं.
माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आज अमित शहा यांना ट्विटर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांनी आठवणीतील एक पारिवारिक फोटोही शेअर केला.