Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आदर्श ग्रामसेवकांच्या पुरस्कारांच्या यादीत घोळ

najarkaid live by najarkaid live
November 23, 2019
in राज्य, राजकारण
0
आदर्श ग्रामसेवकांच्या पुरस्कारांच्या यादीत घोळ
ADVERTISEMENT

Spread the love

पाथर्डी वगळता अन्य नावे फायनल ग्रामपंचायत विभागाकडून लपवालपवी

अहमदनगर – दरवर्षी वादाच्या भोवर्‍यात असणार्‍या जिल्हास्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांची परंपरा यंदाही कायम राहिली. जिल्ह्यात ग्रामीण भागात उत्कृष्ट काम करणार्‍या 2016-17 आणि 2017-2018 या वर्षातील ग्रामसेवकांचा सन्मान करण्यास जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला 2019 उजाडला असून तरी देखील कार्यक्रमाच्या दोन दिवस आधीपर्यंत ग्रामपंचायत विभागाला या दोन्ही वर्षातील सन्मान करणार्‍या ग्रामसेवकांची यादी अंतिम करता आली नव्हती. मात्र, शुक्रवारी सायंकाळी उशीरा पुरस्कारार्थीची नावे अंतिम करण्यात आली असून या दोन्ही वर्षातील पाथर्डीतील पुरस्कारार्थींची नावे टाळण्यात आलेली आहेत. दरम्यान, शनिवार आणि रविवारी सुट्टी असल्याने आता ऐनवेळी पुरस्कार प्राप्त ग्रामसेवकांना सोहळ्यासाठी बोलावण्यात येणार आहे.

जिल्ह्यात 2016-17 आणि 2017-2018 या वर्षात उत्कृष्ट काम करणार्‍या ग्रामसेवकांचा जिल्हास्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सोमवारी सकाळी होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील राहणार असून यावेळी उपाध्यक्षा राजश्रीताई घुले, यासह सभापती आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. मात्र, शुक्रवारी सायंकाळी उशीरापर्यंत पुरस्कारार्थी ग्रामसेवकांची नावे अंतिम करण्यास ग्रामपंचायत विभागाला यश आले नव्हते. याबाबत संबंधीत अधिकारी आणि कर्मचार्‍यांना वारंवार संपर्क केल्यानंतर त्यांनी यादी अंतिम झाली नसल्याचे सांगितले.
याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांची संपर्क साधला असता उपयोग झाला नाही. मात्र, माध्यमामध्ये कार्यक्रम आणि पुरस्कारार्थीची नावे अंतिम झाल्याची माहिती पोहचताच ग्रामपंचायत विभाग हादरला आणि शुक्रवारी सायंकाळी पुरस्कारार्थीची यादी प्रसिध्द केली. दरम्यान, या कार्यक्रमाबाबत जिल्हा परिषद अनभिज्ञ असल्याचे समोर आले. यामुळे यंदा देखील कार्यक्रमात गोंधळ असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, या पुरस्काराच्या निवडीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती असून यात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प अधिकारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ग्रामंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि ग्रामसेवकांचा प्रतिनिधी यांचा समावेश आहे. या समितीने या दोन वर्षातील 13 तालुक्यातील ग्रामसेवकांची निवड अंतिम केलेली आहे. मात्र, पाथर्डी तालुक्यातून आलेल्या पुरस्कारार्थीच्या नावावर तक्रारी आल्याने या तालुक्याची नावे अंतिम होवू शकलेली नाहीत. यामुळे शुक्रवारी उशीरापर्यंत गोंधळाचे वातावरण होते. याबाबत ग्रामपंचायत विभागाकडे विचारणा केल्यानंतर पुस्कारार्थीच्या नावाची लपवालपवी सुरू असल्याचे समोर आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वाहतूक पोलिसांची 2144 पदे निर्माण करण्यास मंजुरी

Next Post

अजित पवारांनी आमदारांना अंधारात ठेवून संख्याबळ दाखवले; शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
अजित पवारांनी आमदारांना अंधारात ठेवून संख्याबळ दाखवले; शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

अजित पवारांनी आमदारांना अंधारात ठेवून संख्याबळ दाखवले; शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

ताज्या बातम्या

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

February 25, 2026
जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us