Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

..आता विरोधकांकडे बोलायला उरलंय काय? सामना अग्रलेखातून भाजपला खडेबोल

Editorial Team by Editorial Team
June 30, 2022
in राजकारण, राज्य
0
शिवसेना-भाजप युती होणार का? संजय राऊतांनी गौप्यस्फोट करत दिलं ‘हे’ उत्तर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : गेल्या काही दिवसापासून सुरू असलेला राज्यातील सत्तापेचा शेवट झाला. काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यामुळे दोन वर्ष सात महिने सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. दरम्यान सामनाच्या अग्रलेखात आज ठाकरे सरकारनं घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा उल्लेख करत  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आले आहे.

उद्धव ठाकरेंनी काल मुख्यमंत्री पदाचा त्याग केला. पण त्यापूर्वी झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाच्या निर्णय घेतले. औरंगाबाद शहराचं नाव बदलून संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नाव बदलून धाराशीव ठेवण्यात आलं. तसेच, नवी मुंबई विमानतळाला गेल्या काही दिवसांपासून दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी होत होती. ठाकरे सरकारनं शेवटच्या कॅबिनेटमध्ये महत्त्वाचा निर्णय घेत नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याचा निर्णय घेतला. या मुद्द्यांवरुन सामना अग्रलेखात शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचं सांगत, भाजपला काही खोचक प्रश्नही विचारण्यात आले आहेत.

सामना अग्रलेखात म्हटलंय की, “महाविकास आघाडी सरकारवर अस्थिरतेचे संकट असतानाच ‘ठाकरे सरकार’ने बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले. लोकभावनेशी संबंधित असे हे निर्णय आहेत. नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय झाला. औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वचनपूर्ती केली.”

विरोधकांकडे आता बोलायला उरलंय काय? 

“ठाकरे’ सरकार औरंगाबादचे संभाजीनगर करायला का घाबरते, असले सवाल मधल्या काळात राज्यातील विरोधी पक्षाने केले. खरे तर फडणवीसांचे राज्य महाराष्ट्रात असताना त्यांनी हे पुण्यकर्म का केले नाही, या प्रश्नाचे उत्तर आधी द्यायला हवे! संभाजीनगरमधील पाण्याचा प्रश्न असो की नामांतराचा, सर्व प्रश्नांवर ठाकरे सरकारने तोडगा काढला. शेवटी अनेकदा लोकभावनेचाच आदर करून निर्णय घ्यावा लागतो. उस्मानाबादचे ‘धाराशीव’ असे नामांतरही बरेच दिवस लटकून पडले होते. याबाबतही शिवसेनेचा शब्द होता. मराठवाडा हा औरंगजेबाप्रमाणे निजामाच्या टाचांखाली भरडलेला प्रदेश आहे.

एका मोठ्या संघर्षातून मराठवाडा निर्माण झाला. औरंगाबादचे संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशीव करणे ही मराठवाडय़ातील मुक्तिसंग्रामात ज्यांनी हौतात्म्य पत्करले, त्याग केला त्या सर्व वीरांसाठी मानवंदनाच ठरेल. हा निर्णय दोन्ही बाजूंनी विनयाने स्वीकारावा, तरच हिंदुत्वाची बूज राहील व राष्ट्रभक्तीचा कस लागेल. माथी भडकवण्याचे उद्योग याप्रश्नी होतील, पण शेवटी औरंगाबादचे संभाजीनगर करणे हा निर्णय शिवरायांच्या महाराष्ट्राने केलाय व ही तर श्रींची म्हणजे हिंदुहृदयसम्राटांची इच्छा होती.”

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शेवटच्या कॅॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ महत्वपूर्ण निर्णय

Next Post

येत्या ३ ते ४ दिवसात या भागात मुसळधार पावसाचा इशारा

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
मान्सून रेंगाळला ; मुंबईसह राज्यात मान्सूनची तारीख बदलली?

येत्या ३ ते ४ दिवसात या भागात मुसळधार पावसाचा इशारा

ताज्या बातम्या

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us