जळगाव,(प्रतिनिधी)- सारनाथ बहुउद्देशीय संस्था, जळगाव तर्फे जळगाव जिल्हा पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल विनोद अहिरे लिखित काळजातील पोलीस महासंचालक या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे *ला.ना शाळेतील भैय्यासाहेब गंधे सभागृहांमध्ये दि. 21 जुलै रविवार रोजी सायंकाळी सहा वाजता* आयोजन करण्यात आलेले आहे. सदर सोहळ्याला पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अशोक भाऊ, जैन दिव्य मराठी जळगाव आवृत्तीचे कार्यकारी संपादक दीपक पाटील, लोकमत जळगाव आवृत्तीचे कार्यकारी संपादक, रवी टाले , मिलिंद बागुल इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
माजी पोलीस महासंचालक श्री संजय पांडे महाराष्ट्र पोलीस दलात प्रचंड लोकप्रिय झाले होते. त्यांनी आपल्या पोलीस महासंचालक कार्यकाळात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बारा किरकोळ रजेवर विस रजा केले आहेत या अगोदर पोलीस कर्मचारी हे पोलीस दलात कर्मचारी म्हणून भरती होत असत आणि कर्मचारी म्हणूनच निवृत्त होत असत संजय पांडे यांनी शासनाला आव्हान पाठवून आता प्रत्येक पोलीस कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवृत्त होत आहे तसेच पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बाबतीत अनेक हिताचे निर्णय त्यांनी घेतली आहेत .त्यांच्याच कार्याची चिकित्सात्मक मांडणी करणारे पुस्तक काळजातील पोलीस महासंचालक विनोद अहिर यांनी लिहिले आहे. या अगोदरही अहिरेंचे ‘मृत्यू घराचा पहारा’ आणि ‘हुंकार वेदनेचा’ ही पुस्तके प्रकाशित झालेली आहे. पोलीस महासंचालकांवर एका पोलीस कॉन्स्टेबलने पुस्तक लिहावे ही महाराष्ट्र पोलीस दलातील पहिलीच घटना असावी असे पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. प्रकाशक सोहळ्याला जास्तीत जास्त नागरिकांनी/साहित्यप्रेमी उपस्थित राहावे असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.
रविवारी काळजातील पोलीस महासंचालक पुस्तकाचे प्रकाशन सारनाथ बहुउद्देशीय संस्था, जळगाव तर्फे जळगाव जिल्हा पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल विनोद अहिरे लिखित काळजातील पोलीस महासंचालक या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे ला.ना शाळेतील भैय्यासाहेब गंधे सभागृहांमध्ये दि. 21 जुलै रविवार रोजी सायंकाळी सहा वाजता* आयोजन करण्यात आलेले आहे. सदर सोहळ्याला पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अशोक भाऊ जैन, दिव्य मराठी जळगाव आवृत्तीचे कार्यकारी संपादक दीपक पटवे, लोकमत जळगाव आवृत्तीचे कार्यकारी संपादक, रवी टाले , मिलिंद बागुल इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
माजी पोलीस महासंचालक श्री संजय पांडे महाराष्ट्र पोलीस दलात प्रचंड लोकप्रिय झाले होते. त्यांनी आपल्या पोलीस महासंचालक कार्यकाळात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बारा किरकोळ रजेवर विस रजा केले आहेत या अगोदर पोलीस कर्मचारी हे पोलीस दलात कर्मचारी म्हणून भरती होत असत आणि कर्मचारी म्हणूनच निवृत्त होत असत संजय पांडे यांनी शासनाला अहवाल पाठवून आता प्रत्येक पोलीस कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवृत्त होत आहे तसेच पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बाबतीत अनेक हिताचे निर्णय त्यांनी घेतली आहेत .त्यांच्याच कार्याची चिकित्सात्मक मांडणी करणारे पुस्तक काळजातील पोलीस महासंचालक विनोद अहिरे यांनी लिहिले आहे. या अगोदरही अहिरेंचे ‘मृत्यू घराचा पहारा’ आणि ‘हुंकार वेदनेचा’ ही पुस्तके प्रकाशित झालेली आहे. पोलीस महासंचालकांवर एका पोलीस कॉन्स्टेबलने पुस्तक लिहावे ही महाराष्ट्र पोलीस दलातील पहिलीच घटना असावी असे पोलीस अधीक्षक महेश्वरी रेड्डी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. प्रकाशन सोहळ्याला जास्तीत जास्त नागरिकांनी/साहित्यप्रेमी उपस्थित राहावे असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.









