सण असो व आमचा वाढदिवस लहानपणासून आई नेहमीच आम्हाला औक्षण करून आशीर्वाद देतात.आज आईंचा वाढदिवस असल्याने मी त्यांचे औक्षण करून त्यांचा आशीर्वाद घेतला व ईश्वरचरणी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. प्रत्येक जन्मी मला त्यांचेच मातृ सुख लाभावे, असे साकडेही मी ईश्वराकडे घातले… हे ट्विट केले आहे लातूर ग्रामीण चे काँग्रेस आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी…
काल आमदार धीरज देशमुख यांच्या आईचा वाढिवस असल्याने त्यांनी अनोखा वाढदिवस साजरा केला. प्रत्येकवेळी आईच आपल्या मुलांना सन असो वाढदिवस या दिवशी औक्षण करून मंगल कामना करते यावेळी मात्र मुलानेच आईच्या वाढदिवसाला औक्षण करून आईच्या दिर्घायुष्यासाठी देवाकडे साकडं घातलं अशा अनोख्या वाढदिवसाचे सोशल मीडियावर सर्वत्र कौतुक होतांना दिसत आहे.















