Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

najarkaid live by najarkaid live
April 28, 2025
in जळगाव
0
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!
ADVERTISEMENT
Spread the love

सध्या महाराष्ट्रात आंबा सीझन जोरात सुरू आहे. मुंबईच्या वाशीचे (Vashi) अेपीएमसीच्या (APMC) बाजारात सुमारे एक लाख आंब्याच्या पेट्यांची आवक होत असून पुणे, कोल्हापूर, सांगली इ. ठिकाणीसुद्धा आंबा सीझन जोरात असल्याचे चिन्ह दिसत आहे. सध्या मुख्यत्वे हापूस आंब्याची मोठी आवक होत असून केसर, पायरी, रत्ना इ. जातीचे आंबेही काही प्रमाणात पहायला मिळतात. भारतीय समाजामध्ये आंब्याची फार लोकप्रियता असून सर्व थरातील लोक आपल्या आवडीनुसार तसेच खिशाला परवडेल अशा आंब्यांची खरेदी करतात. कोकणातील हापूस आंब्याला सर्वांची पसंत असते. परंतु बाजारामध्ये काही फसवणुकीचे प्रकारही होत असल्याचे आढळते. यामध्ये मुख्यत्वे दोन प्रकारची फसवेगीरी आढळते. पहिला म्हणजे कोवळ्या आंब्याला  कॅल्शियम कार्बोनेटची मात्रा लावून पिकविणे. आणि दुसरी म्हणजे कोकणातील हापूसच्या नावाखाली कर्नाटकातील हापूसची विक्री करणे याबाबी आहेत.

फळे पूर्ण परिपक्व होण्यापूर्वी बाजारातील चांगला दराचा फायदा घेण्यासाठी अपरिपक्व फळांना  कॅल्शियम कार्बोनेट ची मात्रा देतात. यासाठी कॅल्शियम कार्बोनेट पावडर च्या पुड्या आंब्याच्या पेटीत ठेवतात. हवेतील आद्रतेने कॅल्शियम पावडरमधून ॲसिटिलन गॅस निर्माण होतो. या ॲसिटिलीन गॅसमुळे आंबा किंवा केळी सारख्या अपरिपक्व फळामध्येसुद्धा पिकण्याची क्रिया सुरू होणे आणि आंब्याच्या फळाचा हिरवा रंग जाऊन चांगला पिवळसर आकर्षक रंग येतो. त्यामुळे फळे आतून पिकलेली नसूनसुद्धा फळाच्या बाहेरील आकर्षक रंगाने गिऱ्हाइकाची फसवणूक होते अशा फळांची चव नैसर्गिकपणे पिकलेल्या आंब्याच्या तुलनेत फारच अपूरी असते आणि ग्राहक फसतात. याशिवाय महत्त्वाचे म्हणजे अपरिपक्व फळे पिकविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कॅल्शियम कार्बोनेटच्या मधून उत्पन्न होणाऱ्या ॲसिटिलीन गॅसमुळे कॅन्सरसारखी भयानक रोगसुद्धा होण्याची शक्यता असते. त्यामुळे आंबा, केळी किंवा इतर कोणतीही फळे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बोनेटच्या वापरावर सरकारने (FSSAI) २०११ मध्ये बंदी घातली आहे. तरीपण चोरटेपणाने आंबा, केळी यासारखी अपरिपक्व फळे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बोनेटचा वापर केला जातो आणि त्यामुळे ग्राहकाची फसवणूक होते. अशी फसवणूक टाळण्यासाठी शासकीय यंत्रणेने बाजारामध्ये फळांची नमुने घेऊन प्रथक्करण करून दोषी लोकांना शिक्षा केली पाहिजे. बाजारामध्ये मोसमाच्या सुरुवातीच्या काळात अधिक दराचा फायदा घेण्यासाठी मुख्यत्वे कॅल्शियम कार्बोनेटचा वापर करतात. त्यामुळे ग्राहकाची फसवणूक होते. कोणती फळे कॅल्शियम कार्बोनेट वापरून पिकवलेली आहेत हे केवळ वरकरणी देखाव्यावरून कळत नसल्याने ग्राहकाची फसवणूक होते. हे टाळायचे असेल तर सरकारी यंत्रणा याबाबतीत अधिक सज्ज असणे आवश्यक आहे.

हापूस आंब्याच्या उत्तम चव, स्वाद, दिखाऊपणा यामुळे हापूस आंब्याला बाजारात जास्त मागणी असते. तसेच दरही अधिक मिळतात. विशेषतः कोकणातील (सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर) आंब्याची चव, स्वाद आणि तेथील विशिष्ट जमीन हवामान उत्पादनाच्या विशिष्ट पद्धती यामुळे हापूस आंब्याला, मुळ विशिष्ट प्रकारचा उत्तम चव, स्वाद, रंग असतो म्हणून कोकणातील आंब्याला G-I मानांकन दिलेले आहे. हापूस आंबा लागवडीपासून चांगला नफा मिळत असल्याने महाराष्ट्राच्या कोकणाबाहेरील काही जिल्ह्यांत तसेच कर्नाटकाच्या उत्तरेकडील धारवाड, बेळगाव, कोप्पल, हावेरी इ. जिल्ह्यांमध्ये तसेच तामिळनाडूतील काही जिल्ह्यांमध्ये लागवड केलेली असून तेथील हापूस फळे महाराष्ट्रातील मुंबईच्या मुख्य मंडईमध्ये तसेच काही मोठ्या शहरामध्येही विक्रीसाठी येत आहेत. कोकणाशिवाय इतरत्र ठिकाणी हापूसची लागवड करून अधिक उत्पादन जरी मिळाले तरी हापूस आंब्यांना कोकणातील विशेषतः देवगड भागातील हापूस आंब्याच्या तोडीची चव, स्वाद, रंग इ. येत नाही. तरी सुद्धा कोकणाबाहेरील हापूस आंब्यापासून कोकणातील हापूस उत्पादकांचे संरक्षण करण्यासाठी कोकणातील हापूस आंब्याला Alphanso Geographical identification (G-I tag) Geographic indication Registry या केंद्रीय सरकारच्या व्यापार विभागातर्फे सन १९९९ च्या कायद्यानुसार दिलेले आहे.

कोकणाबाहेरील कर्नाटकासारख्या भागातून उत्पादित झालेले हापूस कोकणातील हापूस विशेषतः देवगड हापूस म्हणून विकले जात आहेत. त्यामुळे हापूस नावाखाली खरेदी केलेल्या ग्राहकाची मोठी फसगत होत आहे. तसेच कोकणातील खरे जी-आय मानांकित हापूस आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी कोकणातील सर्व हापूस आंबा उत्पादकांनी आपल्या मालावर हापूसचे जी-आय टॅग लावणे जरूरीचे आहे. तसेच हापूस आंबे खरेदी करणाऱ्या ग्राहकानेही आंबे खरेदी करताना अधिक चौकशी करून हापूस आंबे खरेच कोकणातील उत्पादित आहे का? याची खात्री करून आंबे विकत घेतले पाहिजेत.

हा प्रश्न सोडविण्यासाठी अधिक प्रभावी अशा ब्लाॅकचेन, स्मार्ट टॅग, क्यूआर कोड इ. मार्गाचा अवलंब करता येऊ शकतो. परंतु कोकणातील हापूस उत्पादक शेतकरी तसेच हापूस आंबा खरेदी करणाऱ्यांना अधिक जागरूक राहणे गरजेचे आहे.

डाॅ. आर. टी. गुंजाटे (जगविख्यात फलोउद्यानतज्ज्ञ)


Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

Next Post

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

Related Posts

Jalgaon Bhu Sampadan Scam

Jalgaon Bhu Sampadan Scam ; विधानसभेत गाजला, चौकशीची मागणी

July 3, 2025
Electric bus jalgaon

Electric Bus Jalgaon | जळगावमध्ये स्मार्ट ई-बस सेवा लवकरच सुरू होणार!

July 2, 2025
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
Next Post
शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा - शिवकुमार एस

ताज्या बातम्या

Jalgaon Bhu Sampadan Scam

Jalgaon Bhu Sampadan Scam ; विधानसभेत गाजला, चौकशीची मागणी

July 3, 2025
MLA Letterhead Scam 2025

MLA Letterhead Scam 2025 ; आमदारांचे बनावट लेटरहेड वापरून ३ कोटी निधीची अफरातफर – मोठा घोटाळा उघड

July 3, 2025
I love you

 I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

July 3, 2025
Bhilabhau Sonawane Jayanti 2025

Bhilabhau Sonawane Jayanti 2025: राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातील एक महान नेता

July 3, 2025
What is my IP address

What is my IP address? IP Address शोधण्याची सोपी पद्धत

July 2, 2025
Woman Teacher Sexual Abuse Mumbai

Woman Teacher Sexual Abuse Mumbai :नामांकित शाळेतील महिला शिक्षिकेकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; शिक्षिका अटकेत

July 2, 2025
Load More
Jalgaon Bhu Sampadan Scam

Jalgaon Bhu Sampadan Scam ; विधानसभेत गाजला, चौकशीची मागणी

July 3, 2025
MLA Letterhead Scam 2025

MLA Letterhead Scam 2025 ; आमदारांचे बनावट लेटरहेड वापरून ३ कोटी निधीची अफरातफर – मोठा घोटाळा उघड

July 3, 2025
I love you

 I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

July 3, 2025
Bhilabhau Sonawane Jayanti 2025

Bhilabhau Sonawane Jayanti 2025: राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातील एक महान नेता

July 3, 2025
What is my IP address

What is my IP address? IP Address शोधण्याची सोपी पद्धत

July 2, 2025
Woman Teacher Sexual Abuse Mumbai

Woman Teacher Sexual Abuse Mumbai :नामांकित शाळेतील महिला शिक्षिकेकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; शिक्षिका अटकेत

July 2, 2025

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us