Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अहंकार मुक्त गावकी आणि भावकी..!

najarkaid live by najarkaid live
October 28, 2020
in अग्रलेख
1
ADVERTISEMENT
Spread the love

शिक्षण आणि विज्ञानामुळे लोक प्रगती करीत आहेत. पण अहंकार गर्वाने ते समाजातील गावकी आणि भावकी पासून वेगवेगळे पडत आहेत. त्यामुळेच सुशिक्षित लोक सुसंस्कृत आणि संस्कारीत असतीलच असे नाही.ग्रामीण भागात जात पंचायत चांगली आणि वाईट पण होती.कोकणात आज ही गावकी आणि भावकीचे नियम शहरात गेल्यावर सुद्धा पाळले जातात. त्यामुळेच कुटुंबातील वादविवाद वडिलोपार्जित शेतजमीन, संपत्ती आईवडीलांची देखभाल या भावकीत सोडविल्या जातात,मग त्यामुळे पोलीस तक्रारी, न्यायालयातील संघर्ष टाळल्या जातो.काही ठिकाणी कुटुंबातील वादविवाद पोलीस ठाण्यात किंवा न्यायालयाने निर्णय दिल्यावर ही सुटले नाहीत त्यात खून होण्या पर्यंत पोचले आहेत.म्हणूनच एकदा मनापासून वाचावे आमची भावकी चांगली आहे. असे म्हणणारे फार दुर्मिळ आहेत, तर दुसरीकडे आमच्या सारखी भावकी कोणाचीच नाही,असे म्हणणारे सुध्दा खूप आहेत.खरेच आपल्याच रक्ताची माणसे एकमेकाशी एवढी विकृत का वागत असावीत? हे एक कोणालाच न सुटलेले कोडे आहे. अनेक पिढ्या,घरे आणि घराणी यात भूईसपाट झाल्याचा आपला इतिहास आहे.अहंकार मुक्त गावकी आणि भावकी असली पाहिजे त्यातुन कोणीच सुटले नाही.
    तथागत गौतम बुद्ध म्हणजे शुद्धोधन राजाचा पुत्र सिद्धार्थ वीस वर्षाचा झाल्यावर संघाचा सभासद झाला.त्यानंतर आठ वर्षांनी शाक्य आणि कोलियांचे रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी वापरावे यावरून वादविवाद झाला,नंतर त्यांचे रूपांतर भांडणात झाले,त्यात मारामारी झाली.शेवटी दोन्ही राज्यातील लोकांनी युध्द करण्यासाठी ग्रामसभा घेऊन ठराव घेण्याचे ठरविले,युद्धात रक्तपात होणार त्यात आपलीच माणसं मारली जातील यासाठी सिद्धार्थाने युद्ध करण्यास विरोध केला.संघाचा निर्णय युद्ध करण्याचा झाला होता.संघाचा निर्णय सर्व सभासदांना बंधनकारक असतो,ज्यांना तो मान्य नसेल त्याला गृहत्याग राज्यत्याग करावे लागते.राजपुत्र सिद्धार्थाने युद्धात भाग न घेण्यासाठी गृहत्याग राजत्याग केला हा इतिहास आहे.अहंकार मुक्त गावकी आणि भावकी नसली तर काय घडू शकते त्यांचे हे जागतिक पातळीवरील उदाहरण आहे.
शहाजीराजे,शिवराय,शंभूराजे यांनाही याच्या झळा लागलेल्या आहेत, पुण्यातील पेशव्यांनी तर यात कळस गाठला आहे.मराठयांचा विस्वास तर पानिपतला गेला.ती इतिहासाची पाने तर रक्तरंजीत आहेत थोडक्यात यातून कोणाचीच सुटका होत नाही. कारण तसा कोणी प्रयत्न केला तर त्याला दुबळा समजून त्रासच दिला जातो. कारण भावकीतील व्यक्तीला नमवीण्यात एक वेगळाच अहंकार,गर्व दडलेला असतो,त्याचा माज व्यक्त करण्यात एक असूरी आनंद असतो. म्हणूनच राज्यात देशात जात पंचायत, संघ, गावकी आणि भावकीने खूप धुमाकूळ घातला होता.गांव सोडून शहरात गेलेली लोक गावकी आणि भावकी पासून मुक्त झाले.त्यांना वडिलोपार्जित शेतजमीन घर आणि संपत्तीत वाटा मांगण्यासाठी आज दिवाणी खटले, फौजदारी गुन्हे मोठ्या प्रमाणात अनेक न्यायालयात सुरु आहेत.   शेतजमिनीचे वाद यात भावकीच्या भांडणाचा क्रमांक नेहमी पहीला आहे.बुलढाणा जिल्ह्याती पाच तालुख्यात (मलकापूर,नांदुरा,जळगांव जामोद संग्रामपूर,शेगाव) तेरा हजार खटले एकत्र कुटुंबातील वादविवादाचे आहे. असे एका समाजसेवकांनी सांगितले.कारण लग्न जुळवतांना सामाजिक समाजसेवक नातलग गांवातील वडीलधारी माणस लागतात.पण आपसातील वादविवाद शुल्क भांडणे मिटविण्यासाठी त्यांचे ऐकल्या जात नाही.म्हणूनच मग हे दिवाणी फौसदारी खटले चालू आहेत.अहंकार मुक्त गावकी आणि भावकी नसल्यामुळे असे एकाच समाजातील खटले लक्षवेधी आहेत. 
समाजात वैचारिक प्रबोधन नाही काय?. ते तर प्रत्येक जातीत आहे.जात आणि धर्म कोणीच विसरत नाही. अहंकार मुक्त गावकी आणि भावकी तरुण पिढीच्या आयुष्याला वेगळे वळण दिले जाणार आहे. त्यासाठी किती समाजसेवक सामाजिक बांधिलकी म्हणनू आपला वेळ समाजाला देतात. उच्चशिक्षित उच्चपदस्थ अधिकारी हे समाजासाठी आदर्श व्यक्तीमत्व आहेत काय?.त्यांना सुरक्षित नोकरी मिळाली तर ते स्वताला जगावेगळे समजायला लागले. त्यांची योग्य किंमत फक्त कार्यालयात असते,पण तो कायम डोक्यात ठेवते की मी मोठा अधिकारी आहे, घरात आणि समाजात तो तसाच वागतो तेव्हाच लोक त्याला त्यांची जागा व लायकी दाखवितात.मग ते म्हणतात समाजातील लोक सुधारत नाही. आपण त्यांच्यात सुधारणा करण्यासाठी किती वेळ दिला.हे कोणीच सांगत नाही. हे प्रश्न स्वतःला आपण दररोज विचारले तरी आपल्यात बदल होऊ शकतो आणि हेच आपल्या हातात आहे .
 गावकी आणि भावकीत सामाजिक बांधिलकी ठेऊन काम केले चर्चा करून वादविवाद टाळले तर समाजाचा खूप मोठा फायदा होऊ शकतो.कारण आयुष्यातील निम्मी शक्ती,संपत्ती आणि बहूमुल्य वेळ आपला यातच वाया चालला आहे. सुधारायचे असेल तर ही शक्ती,संपत्ती आणि वेळ सत्कारणी लावता आला पाहीजे.एका कुटुंबांची आर्थिक, शैक्षणिक परिस्थिती सुधारली म्हणजे सर्वच समाजाचा परिस्थिती सुधारली असे होत नाही. लग्नात कोणी ही सहभागी होऊ शकतो, पण मेल्या नंतर अंतीमसंस्कार करतांना किती बाहेरच्या समाजातील लोक सहभागी होतात त्याला खूप महत्व असते.म्हणूनच आमच्या पूर्वजांनी,संस्कृतीने अंतिम संस्कार यात्रेत चार पैकी तिन खांदेकरी भावकीचे असावेत असा कडक अलिखित नियम होता. सोने,चांदी,जमीन बंगला गाडी संपत्ती किती आहे. त्यांची समाजात किंमत शून्य असते,समाजातील सामाजिक,धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक कार्यात किती योगदान आहे याचे शेवटी मूल्यमापन होत असते. म्हणूनच शैक्षणिक पात्रता आणि आर्थिक प्रगती कितीही असली तरी प्रत्येकाचा शेवटचा प्रवास हा भावकीच्या खांद्यावरच होणार असतो.हे प्रत्येक समाजाच्या व्यक्तीने कायमस्वरूपी लक्षात ठेवले पाहिजे त्यासाठी अहंकार मुक्त गावकी आणि भावकी येणाऱ्या पिढीचे यशस्वी भविष्य घडवू शकते. वाचकांना नम्र विनंती बघा जेवढे जमेल तेवढे घ्या आणि गावकी आणि भावकीला सांगा,चर्चा करून मार्ग काढा.संघटीत असल्या शिवाय संघर्ष करणे म्हणजे स्वताचे न भरून येणारे नुकसान करणे आहे.म्हणूनच आपण आपले कुटुंब,आपला समाज आणि आपले गांव सर्व दुष्टीने संघटीत आणि अहंकार मुक्त गावकी भावकी असावी.
सागर रामभाऊ तायडे
९९२०४०३८५९,भांडुप मुंबई.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हल्ला करत आठ जणांचा बळी घेणारा नरभक्षक वाघ जेरबंद

Next Post

सेवेत कायम नियुक्तीच्या नावाखाली ४०० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार – देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Related Posts

महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज ; लौकिकाकडून अलौकिकाकडे एक ऐतिहासिक प्रवास…

महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज ; लौकिकाकडून अलौकिकाकडे एक ऐतिहासिक प्रवास…

December 4, 2024
कलम बहादरांचा सरदार वसंत मुंडे – संघर्षाचा उत्कल बहर

कलम बहादरांचा सरदार वसंत मुंडे – संघर्षाचा उत्कल बहर

December 31, 2022
धर्मांतरासाठी विजयादशमीचाचं दिवस का निवडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, त्या दिवशी कोणत्या घोषणेनं नागपूर दणाणलं होतं…

धर्मांतरासाठी विजयादशमीचाचं दिवस का निवडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, त्या दिवशी कोणत्या घोषणेनं नागपूर दणाणलं होतं…

October 5, 2022
सागर तायडे म्हणजे वास्तववादी निर्भीडपणे लिहणारा स्तंभ लेखक

सागर तायडे म्हणजे वास्तववादी निर्भीडपणे लिहणारा स्तंभ लेखक

October 1, 2020
कोरोना युद्ध नको… बुद्ध हवा..!

कोरोना युद्ध नको… बुद्ध हवा..!

May 6, 2020

कोरोनाशी लढतांना – “अंतर” महत्त्वाचे !

April 29, 2020
Next Post
देवेंद्र फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर केलं हे अवाहन…

सेवेत कायम नियुक्तीच्या नावाखाली ४०० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार - देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Comments 1

  1. सागर रामभाऊ तायडे says:
    5 years ago

    माननीय संपादक नमस्कार
    मनःपूर्वक आभार आणि हार्दिक अभिनंदन
    आपला
    सागर तायडे भांडुप मुंबई

ताज्या बातम्या

शिवसेनेत पत्रकार भुवनेश दुसाने यांचा आ. किशोरअप्पा पाटिलांच्या हस्ते प्रवेश

शिवसेनेत पत्रकार भुवनेश दुसाने यांचा आ. किशोरअप्पा पाटिलांच्या हस्ते प्रवेश

September 9, 2025
Prostitution customer | वेश्यागृहात जाणाऱ्यांवर हायकोर्टाचा दणका : हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय !

Prostitution customer | वेश्यागृहात जाणाऱ्यांवर हायकोर्टाचा दणका : हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय !

September 9, 2025
महाराष्ट्र हादरला! : 12 वर्षीय बालिकेवर दोघांकडून अत्याचार

महाराष्ट्र हादरला! : 12 वर्षीय बालिकेवर दोघांकडून अत्याचार

September 9, 2025
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले मोठे ४ निर्णय!

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले मोठे ४ निर्णय!

September 9, 2025
प्रकृतीचे रक्षण ही सर्वांची जबाबदारी – महामंडलेश्वर जनार्दनहरिजी महाराज

प्रकृतीचे रक्षण ही सर्वांची जबाबदारी – महामंडलेश्वर जनार्दनहरिजी महाराज

September 9, 2025
पोटच्या मुलीनं नको ते पाहिलं  ; आईनं ६ वर्षीय मुलीचा खून, विहिरीत फेकला मृतदेह

पोटच्या मुलीनं नको ते पाहिलं ; आईनं ६ वर्षीय मुलीचा खून, विहिरीत फेकला मृतदेह

September 8, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us