नवी दिल्ली : अविवाहित महिलेच्या अविवाहित महिलेला 24 आठवड्यांच्या गर्भपातास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. न्या. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. काही दिवसांपूर्वीच हायकोर्टाने या महिलेला गर्भपात करण्याची परवानगी नाकारली होती. एखाद्या विवाहित महिलेप्रमाणे अविवाहित महिलांनाही गर्भपाताचा अधिकार असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले.
न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने सांगितले की, एखादी महिला अविवाहित आहे म्हणून तिला गर्भपात करण्यास मनाई केली जाऊ शकत नाही. खंडपीठाने मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेंसी कायदा 2021 मधील संशोधनाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, यामध्ये ‘पती’च्या ऐवजी जोडीदार असा उल्लेख आहे. अविवाहित महिलांना या कायद्यात स्थान आहे, हे दर्शवणारी ही बाब असल्याचे कोर्टाने म्हटले.
सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या याचिकेत म्हटले होते की, गर्भपातासंबंधीच्या कायद्यात अविवाहित महिलेच्या गर्भपाताबाबत कोणतेही भाष्य करण्यात आले नाही.
दिल्ली हायकोर्टाने काय म्हटले होते?
अविवाहित महिलेला 23 आठवड्यानंतर गर्भपात करण्याची परवानगी देता येणार नसल्याचे म्हटले. अशा स्थितीत गर्भपात करणे म्हणजे भ्रूण हत्या करण्यासारखे असल्याचे हायकोर्टाने म्हटले. कोर्टाने याचिकाकर्त्यांना बाळ जन्माला येईपर्यंत ‘सुरक्षित ठिकाणी’ राहण्याचा सल्ला दिला असून प्रसुतीनंतर बाळाला दत्तक येता येईल असेही सुचवले















