मुंबई, – अर्णब गोस्वामी प्रकरणी राज्यपाल यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन केला होता..पण कोरोना संसर्गामुळे तसं करता येणार नाही असं सांगून गृहमंत्र्यांनी कायदा दाखविला आहे.
या बाबत सविस्तर असे की, अन्वय आत्महत्या प्रकरणी कारागृहात असलेले रिपब्लिकन भारतचे संपादक अर्णब गोस्वामी यांना कुटुंबियांना कारागृहात भेटू देण्यासाठी राज्यपाल कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन आला होता असं खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलतांना काल सांगितलं.
अर्णब गोस्वामी यांचा मे.मुबंई उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्याने कारागृहाचा मुक्काम वाढला आहे. दरम्यान अर्णब याच्या परिवारास त्यास भेटू देण्यात यावं या साठी थेट राज्यपाल यांनीच गृहमंत्र्यांना फोन केला… त्यावर गृहमंत्र्यांनी राज्यपाल यांना सांगितलं की, कोरोना संसर्गामुळे कारागृहात कुणालाच भेटू दिलं जात नाही…. त्यामुळं अर्णब च्या परिवाराला देखील भेटता येणार नाही असं गृहमंत्र्यांनी सांगून टाकलं. तर अर्णब प्रकरणावर गृहमंत्री म्हणाले की, संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने जे कायदेशीर असेल तेच होईल असंही ते यावेळी माध्यमांशी बोलत होते.














