मुंबई- रिपब्लिकन भारत चैनल चे संपादक अर्णव गोस्वामी यांना झालेल्या अटकेवरून संघर्ष अजूनही सुरूच असल्याचं दिसत आहे. अर्णव गोस्वामी यांना आज अलिबाग ऊन खारघरच्या तळोजा कारागृहात आणण्यात आले त्यावेळी बाबुराव बाहेर अर्नब गोस्वामी समर्थकअर्नब गोस्वामी व पोलिसांच्या समर्थकांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. समर्थकांमध्ये काही वाद होण्याच्या पूर्वी पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने प्रकरण मिटले.
महाराष्ट्र पोलीस जिंदाबाद चे नारे लावत पोलिसांच्या समर्थनात जमलेल्या जमावाने समर्थन दिले. दरम्यान भारतीय जनता पक्षाने अर्नब गोस्वामी प्रकरणावर ठाकरे सरकार वर चांगलीच टीकेची झोड उठवली आहे. तसेच शिवसेनेने देखील भाजपाला जोरदार उत्तर दिले आहे. भाजपच्या काही नेत्यांनी तर अर्णबच्या सुटकेनंतर दिवाळी साजरी करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांमुळे अर्णब प्रकरणावर संघर्ष कायम असल्याचं चित्र दिसत आहे.
















