Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अबब…दहा महिन्यांत एकही वीजबिल न भरणारे खान्देशात ‘इतके’ लाख ग्राहक

खान्देशात २ लाख ६२ हजार ग्राहक, १७० कोटी थकबाकी ; ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे - महावितरणचे आवाहन

najarkaid by najarkaid
February 13, 2021
in जळगाव
0
अबब…दहा महिन्यांत एकही वीजबिल न भरणारे खान्देशात ‘इतके’ लाख ग्राहक
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव/धुळे/नंदुरबार : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च २०२० मध्ये देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानादेखील महावितरणने ग्राहकांना अखंडित व नियमित वीजपुरवठा करून ग्राहकांना घरात राहणे सुसह्य केले. एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या दहा महिन्याच्या काळात थकीत वीजबिलापोटी कोणत्याही ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला नाही. एप्रिल २० ते जानेवारी २१ सलग या दहा महिन्यांच्या काळात खान्देशातील २ लाख ६२ हजार २६३ घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांनी एकही वीज बिल भरले नाही. त्यांच्याकडे १७० कोटी रुपये थकबाकी आहे.

यात जळगाव जिल्ह्यातील १ लाख ४१ हजार १०४ ग्राहक (९२ कोटी थकबाकी), धुळे जिल्ह्यातील ७६ हजार ८३६ ग्राहक (५६ कोटी थकबाकी) व नंदुरबार जिल्ह्यातील ४४ हजार ३२३ ग्राहकांचा (२२ कोटी थकबाकी) समावेश आहे. राज्यभरातील वीजबिलांच्या थकबाकीमुळेमहावितरणला प्रचंड मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी दर महिन्याला वीज खरेदी करावी लागत असून विजेच्या पारेषणावरही मोठा खर्च करावा लागत आहे. महावितरणला ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. महावितरणची आर्थिक परिस्थिती लक्षात घेवून ग्राहकांनी आपल्या वीजबिलांचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २३ मार्च २० पासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे ग्राहकांकडे जाऊन वीजमीटरचे रीडिंग घेणे तात्पुरते बंद करण्यात आले. लॉकडाऊन सुरू असताना मार्च ते साधारणतः जून महिन्यापर्यंत भर उन्हाळ्यात नागरिकांना घरात राहणे सुसह्य व्हावे, यासाठी वीजपुरवठा सुरळीत व अखंडित ठेवण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. कोरोनाच्या कालावधीत अखंडित वीजपुरवठ्यासाठी कर्तव्य बजावताना संसर्गामुळे अनेकांना प्राण गमावावे लागले. विशेष म्हणजे या १० महिन्याच्या कालावधीत थकबाकीच्या कारणावरून सर्वच वर्गवारीमधील एकाही वीजग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला नाही. वाढत्या थकबाकीच्या पार्श्वभूमीवर विजेचा मागणी व पुरवठा यामध्ये महावितरणला वीजखरेदीचा आर्थिक ताळमेळ बसविण्यासाठी सध्या वीजग्राहकांच्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे. दरमहा वसुलीच्या सुमारे ८० ते ८५ टक्के रकमेतून वीजखरेदी केली जाते. वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा सुरु आहे. मात्र दर महिन्यात होणाऱ्या वीजबिल वसुलीचे प्रमाण अतिशय कमी असल्याने दरमहा वीजखरेदी, कंत्राटदारांची देणी, कर्जांचे हप्ते, आस्थापना खर्च, दैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्च भागवणे अशक्य होत आहे. परिणामी येत्या काही दिवसात या थकबाकीमुळे वीजपुरवठ्यावरदेखील परिणाम होण्याची व अडचणी येण्याची शक्यता आहे.
राज्यात वीजबिलांच्या एकूण ९,८०,४९९ पैकी ९,३३,३२४ तक्रारीचे निवारण महावितरणने केले आहे. उर्वरित तक्रारींचे निवारण करण्याची प्रक्रिया देखील अंतिम टप्प्यात आहे. राज्यातील वीजबिलांच्या केवळ ४७ हजार तक्रारी वगळता उर्वरित सर्व तक्रारींचे महावितरणकडून निवारण करण्यात आले आहे. याशिवाय वीजग्राहकांच्या तक्रारी किंवा शंका निरसन करण्यासाठी राज्यभरात ३२०१ वेबिनार, ५६७९ मेळावे घेण्यात आले होते. तसेच १५५२४ मदत कक्ष सुरु करण्यात आले होते. त्यापैकी १७४२ मदत कक्ष अद्यापही सुरु आहे.लॉकडाऊनमुळे मार्चनंतर प्रथमच वापरलेल्या विजेचे प्रत्यक्ष रिडींग जून महिन्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे जूनच्या वीजबिलात लॉकडाऊनच्या कालावधीमधील (सुमारे ९० ते ९७ दिवस) वीजवापरानुसार युनिट संख्या नोंदविण्यात आली आहे. या युनिट संख्येला सुमारे तीन महिन्यांत विभागून योग्य स्लॅब दरानुसार वीजबिलाची आकारणी करण्यात येत आहे. त्यामध्ये एका पैशाचाही अतिरिक्त भुर्दंड लादलेला नाही. याबाबतचा संपूर्ण हिशेब प्रत्येक घरगुती ग्राहकांसाठी https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर उपलब्ध आहे. मीटर रिडींगनुसार देण्यात आलेली वीजबिले अचूकच आहेत. केवळ मीटर रिडरकडून अनावधानाने रिडींग घेण्यात काही चूक झाली असल्यासच वीजबिल चुकीचे असू शकते. मात्र महावितरणकडून रिडींगप्रमाणे देण्यात येणारी वीजबिल चुकीचे आहे हा गैरसमज ग्राहकांनी करून घेऊ नये असा स्पष्ट निर्वाळा वीजक्षेत्रातील तज्ञांनी देखील दिला आहे.
वीजग्राहकांनी रिडींगप्रमाणे दिलेल्या वीजबिलांबाबत कोणताही संभ्रम बाळगू नये. एप्रिल, मेमधील लॉकडाऊनचा कालावधी, प्रखर उन्हाळा व सर्वच जण घरी असल्याने वाढलेला वीजवापर आदींमुळे युनिटची संख्या वाढलेली आहे. मात्र २०१९ मधील एप्रिल ते जूनच्या कालावधीतील वीजवापराचा विचार केल्यास यंदाच्या एप्रिल ते जूनपर्यंत तेवढाच वीजवापर झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वीजग्राहकांवर कोणत्याही प्रकारचा आर्थिक भूर्दंड लादण्यात आलेला नाही किंवा फसवणूक करण्यात आलेली नाही. केवळ लॉकडाऊनमुळे एप्रिल व मेमध्ये सरासरी वीजबिले द्यावी लागल्याने ती मीटर रिडींगप्रमाणे अचूक दुरुस्त करून जूनमध्ये एकूण तीन महिन्यांचे वीजबिल देण्यात आले आहे. तसेच सरासरी वीजबिलांची रक्कम भरली असल्यास ती जून महिन्यातून वजा करण्यात आली आहे.
महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर (कृषी वगळून) सर्व उच्च व लघुदाब वीजग्राहकांना थकीत व चालू वीजबिलांच्या रकमेचा भरणा करण्यासाठी हप्त्यांची सोय उपलब्ध झाली आहे. यासाठी नवीन योजना तयार करण्यात आली असून आर्थिक अडचणीत असलेल्या थकबाकीदार वीजग्राहकांनी दिलासा देण्यात आला आहे. सोबतच खंडित वीजपुरवठा पुन्हा सुरु करण्याची संधी देण्यात आली आहे. या योजनेमध्ये वीजपुरवठा सुरु असलेल्या ग्राहकांसोबतच तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेले, वीजचोरी किंवा न्यायप्रविष्ट प्रकरणातील वीजग्राहकांना सहभागी होता येईल. केवळ दोन टक्के रक्कम भरून या योजनेत सहभागी होता येणार आहे. उच्चदाब वीजग्राहकांना मंडल कार्यालय, २० किलोवॅटपेक्षा अधिक वीजभार असलेल्या लघुदाब ग्राहकांना विभागीय कार्यालय आणि २० किलोवॅटपर्यंत वीजभार असलेल्या लघुदाब ग्राहकांना उपविभाग कार्यालयांमध्ये अर्ज करून या योजनेत सहभागी होता येईल.
वाढत्या थकबाकीच्या पार्श्वभूमीवर विजेची मागणी व पुरवठा यामध्ये महावितरणला वीजखरेदीचा आर्थिक ताळमेळ बसविण्यासाठी सध्या वीजग्राहकांच्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे. विजेचे दर हे महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाद्वारे निश्चित करण्यात येत असतात. वाढीव वीज बिल आल्याच्या तक्रारींची शहानिशा करण्याचे निर्देश राज्याचे उर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. वीज ग्राहक हे महावितरणचे दैवत असून ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यास कटीबद्ध आहे. हेल्प डेस्कद्वारे वीज बिलांसंबंधी तक्रारींचे निवारण करण्यात येत असून याबद्दल ग्राहकांनी समाधानही व्यक्त केलेले आहे. तेंव्हा कोणत्याही भूलथापांना बळी न पडता ग्राहकांनी आपले वीज बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील प्रलंबित पाटबंधारे प्रकल्पांना चालना देण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव सादर करा

Next Post

वामन वाघुळदे निवर्तले !

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

March 29, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
वामन वाघुळदे निवर्तले !

वामन वाघुळदे निवर्तले !

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us