धुळे : शिरपूर तालुक्यात अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आलीय. या अपघात भरधाव कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसल्याने 12 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघाताची थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अंगावर काटा आणणारा हा अपघात आहे.
नेमकी घटना काय?
मुंबई-गोवा महामार्गावरुन बांधकाम साहित्य घेऊन जाणारा भरधाव कंटेनर चालला होता. धुळ्यातील पळासनेरजवळ ब्रेक फेल झाला. यानंतर कंटेनर अनियंत्रित झाला आणि रस्त्यावर उभ्या वाहनांना उडवत हॉटेलमध्ये घुसला. अचानक घडलेल्या या घटनेने महामार्गावर एकच हाहाःकार उडाला.
बुलढाण्यानंतर आणखी एक भीषण अपघात, 2 गाड्यांना फरफटत नेलं आणि थेट हॉटेलमध्ये घुसला कंटेनर, ९ जणांचा जागीच मृत्यू #roadaccident #marathinews #News18lokmat pic.twitter.com/TyzQbnsZ4y
— News18Lokmat (@News18lokmat) July 4, 2023
या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर 28 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. मयतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.दरम्यान, अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
















