Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

१ जानेवारी पासून रेशन दुकानदारांचा देशव्यापी संप

najarkaid live by najarkaid live
December 30, 2023
in जळगाव
0
‘या’ लाभार्थ्यांना पुढील ५ वर्षासाठी मोफत अन्नधान्य मिळणार ; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)-  विविध प्रलंबित मागण्यांसाठी रेशन दुकानदारांचा १ जानेवारी २०२४ पासून देशव्यापी संप सुरू होत असून दुकानदारांनी या संपात मोठया प्रमाणात सहभागी होऊन संप यशस्वी करावा असं आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

 अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघ, पुणे कडून या पत्राद्वारे राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार बंधू-भगिनींना असे आवाहन करण्यात येत आहे की, आपण सर्वांनी ऑल इंडिया फेयर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशन, नवी दिल्ली, या देशपातळीवरील संघटनेने सोमवार, दिनांक ०१ जानेवारी, २०२४ पासून अनिश्चित काळासाठी पुकारलेल्या रेशन बंद आंदोलनामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपली रेशन दुकाने बंद ठेवावीत, या काळात आपण सर्वांनी आपापल्या दुकानातील ई-पॉस मशीन कार्यान्वित करू नयेत, तसेच कोणत्याही प्रकारे धान्याची उचल व वितरण देखील करू नयेत.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, की, सार्वजनिक वितरण प्रणालीची सर्वात शेवटची कडी असणार्‍या राज्यातील सर्व ५३,००० रास्त भाव दुकानदारांच्या प्रलंबित न्याय हक्क मागण्यांसंदर्भात केंद्र व राज्य शासन पूर्णपणे उदासीन आहे. आपण वेळोवेळी केलेल्या आंदोलनाची व मोर्चाची शासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही, महासंघाने दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन शासनामार्फत दिनांक १२ डिसेंबर, २०२३ रोजी सचिव, यांच्या अध्यक्षतेखाली हिवाळी अधिवेशन काळात नागपूर, येथे महासंघाच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली असली, तरीही त्यामध्ये फक्त आश्वासन देण्यापलीकडे कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.

त्यामुळे महासंघाच्या वतीने नाईलाजास्तव ऑल इंडिया फेयर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशन, नवी दिल्ली या देशपातळीवरील संघटनेने दिनांक ०१ जानेवारी, २०२४ पासून अनिश्चित काळासाठी पुकारलेल्या रेशन बंदआंदोलनामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी आपले संघटनात्मक मतभेद बाजूला ठेवून सहभागी व्हावे, असे आवाहन महासंघाकडून करण्यात येत आहे. या आंदोलनाचे घोषवाक्य पचास हजार से कम नही| कमिशन मे कुछ दम नही| असे आहे.

दरम्यान, या अनुषंगाने सोमवार, दिनांक ०१ जानेवारी, २०२४ पासून आपल्या रेशन बंद आंदोलनाची सुरुवात होत आहे. या आंदोलनामध्ये प्रत्येक स्वस्त धान्य दुकानदार हे तहसील कार्यालयासमोर संविधानिक मार्गाचा अवलंब करून निदर्शने, धरणे, घंटा नाद, थाळी नाद या प्रकारातील आंदोलन करणार असल्याचेही या पत्रकात नमूद केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आई’ धोरणांतर्गत महिलांसाठी आणखी एक सवलत ; पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

Next Post

उपकार्यकारी अभियंता स्वाती योगेश नन्नवरे यांची शासकीय अभियंता सहकारी पतपेढीच्या संचालक पदी बिनविरोध निवड

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
उपकार्यकारी अभियंता स्वाती योगेश नन्नवरे यांची शासकीय अभियंता सहकारी पतपेढीच्या संचालक पदी बिनविरोध निवड

उपकार्यकारी अभियंता स्वाती योगेश नन्नवरे यांची शासकीय अभियंता सहकारी पतपेढीच्या संचालक पदी बिनविरोध निवड

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us